T20 World Cup SA vs NED Sachin Tendulkar Tweet: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ च्या सामन्यात आज नेदरलॅंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळाला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ १३ धावांच्या फरकाने नेदरलँड्सकडून पराभूत झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला चिमटा घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास ट्वीट केले आहे. एकीकडे नेदरलँडच्या विजयाने टी २० विश्वचषक उपांत्य फेरीत भारताचे स्थान निश्चित झाले आहे तर पाकिस्तानच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेचा संघ बलवान असूनही आधी पाकिस्तानच्या टीम समोर पराभूत झाला. आता त्यापाठोपाठ टी २० विश्वचषकाच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात कमी गुण असणाऱ्या नेदरलँडच्या संघानेही दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. आता या लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरच्या ट्वीटची चांगलीच चर्चा आहे. सचिनने ट्वीटमध्ये म्हंटले की, “मी ब्रेकफास्ट करण्यासाठी मित्राबरोबर बाहेर गेलो होतो त्याला म्हणालो आपण डचला जाऊयात, असं म्हणताच हसून त्याच्या घशातच घास अडकला.” या ट्विटमध्ये सचिनने नेदरलँडच्या संघाचे विजयानंतरच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.

सचिन तेंडुलकर ट्वीट

एकट्या सचिननेच नव्हे तर भारताची माजी तुफानी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही टेम्बा बावुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाला टोला लगावला आहे.
सेहवागने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “यंदाचा विश्वचषक ट्विस्टने रंगला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवले हे पाहून मजा येतेय” .

विरेंद्र सेहवाग ट्वीट

T20 World Cup: नेदरलँड दुग्धजन्य पदार्थांचा देश म्हणून… SA विरुद्ध विजयावर मराठी लेखकाची पोस्ट होतेय Viral

दरम्यान आजचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामना कसा झाला हे थोडक्यात पाहायचे तर.. कॉलिन अकरमनच्या २६ चेंडूत ४१ धावा आणि टॉम कूपरच्या ३५ (१९ चेंडू) महत्त्वपूर्ण पार्टनरशिपमुळे नेदरलँड्सने २० षटकात १५८-४ असे लक्ष्य उभे केले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने १४५ धावाच करता आल्या. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील नेदरलॅंड संघाने १३ धावांनी दक्षिण आफ्रिकेला हरवले. अ‍ॅकरमनला त्याच्या फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.