टी२० वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकालांच्या परंपरेत नेपाळचं नाव समाविष्ट होणार अशी चिन्हं होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मुकाबल्यात ६ चेंडू ८ धावा समीकरण होतं. शेवटच्या चेंडूवर नेपाळला दोन धावांची आवश्यकता होता. दक्षिण आफ्रिकेने प्रसंगावधान राखत अफलातून क्षेत्ररक्षणाच्या बळावर गुलझन शा याला बाद केलं. अवघ्या एका धावेने दक्षिण आफ्रिकेने नेपाळला नमवलं.

शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला ६ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने ओटनिल बार्टमनवर विश्वास ठेवला. पहिल्या दोन चेंडूवर गुलशन झा याला एकही धाव काढता आली नाही आणि नेपाळवरचं दडपण वाढलं. तिसऱ्या चेंडूवर गुलशनने खणखणीत चौकार लगावला आणि नेपाळच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. चौथ्या चेंडूवर गुलशनने दोन धावा मिळवल्या. पाचव्या चेंडूवर एकही धाव मिळू शकली नाही आणि नेपाळसाठी समीकरण कठीण झालं. शेवटच्या चेंडूवर नेपाळला जिंकण्यासाठी २ तर टाय करण्यासाठी एका धावेची आवश्यकता होती. बार्टमनचा उसळता चेंडू गुलशनला तटवता आला नाही. चेंडू विकेटकीपर क्विंटन डी कॉककडे गेला. त्याने हुशारीने चेंडू मिडविकेटला उभ्या असलेल्या हेनरिच क्लासनच्या कडे फेकला. त्याने चपळतेने नॉन स्ट्रायकिंग एन्डला स्टंप्सवर चेंडू फेकत गुलशनला बाद केलं.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

नेपाळच्या चाहत्यांनी सामन्यादरम्यान संघाला शानदार पाठिंबा दिला होता. गुलशन झा बाद होताच चाहत्यांचा विश्वासच बसेना. नेपाळने दक्षिण आफ्रिकेला ११५ धावाच करू दिल्या. छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळने जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला मात्र शेवटच्या चेंडूवर नशिबाने साथ सोडली आणि त्यांचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने चार पैकी चारही सामने जिंकले असून त्यांचे ८ गुण झाले आहेत. नेपाळने ३ सामने खेळले असून त्यापैकी २ मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर एक लढत पावसामुळे रद्द झाली.