SA vs AFG Highlights, T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. यासह अफगाणिस्तान संघाचे प्रथमच विश्वचषक फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ विकेट्सने जिंकला, अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५६ धावा करून सर्वबाद झाला. तर दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत 57 धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स २९ धावा करून नाबाद परतला आणि कर्णधार एडन मारक्रम २३ धावा करून नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एकमेव विकेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अफगाणिस्तानकडून एकमेव फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला, अजमतुल्ला उमरझाईने १० धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सन आणि तबरेझ शम्सी यांनी ३-३ तर एनरिक नॉर्खिया ​​आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही, कारण संघाने २३ धावांत ५ विकेट गमावल्या आणि अवघ्या ५६ धावा करून संपूर्ण संघ कोसळा. दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हन कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

Live Updates

T20 World Cup 2024, South Africa vs Afghanistan Semi Final Live: दक्षिण आफ्रिने अफगाणिस्तानवरील विजयासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाचा विजय निश्चित केला.

08:11 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत

अफगाणिस्तानवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. एडन मारक्रम आणि रीझा हेंड्रिक्सच्या सावध फलंदाजीसह आफ्रिकेने एक विकेट गमावत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची या विजयात महत्त्वाची भूमिका आहे.

07:52 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: ५ षटकांनंतर आफ्रिकेची धावसंख्या

५ षटकांत दक्षिण आफ्रिकेने १ विकेट गमावत २७ धावा केल्या. तर मैदानात मारक्रम आणि हेंड्रिक्सची जोडी मैदानात कायम आहे आणि संधी मिळताच मोठे फटकेही खेळताना दिसत आहेत.

07:33 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानची चांगली सुरूवात

अफगाणिस्तानच्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फजलहक फारूकीने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या फलंदाजाची शिकार केली आहे. फजलहकने दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर डिकॉकला क्लीन बोल्ड केलं. यासह आफ्रिकेने २ षटकांत १ बाद ६ धावा केल्या.

07:25 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेच्य डावाला सुरूवात

दक्षिण आफ्रिकेचा संघ ५७ धावांचे सोपे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

07:17 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानचे फलंदाज

अफगाणिस्तानला पहिला झटका पहिल्याच षटकात रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने बसला, तर दुसरी विकेट तिसऱ्या षटकात गुलबदिन नायबच्या रूपाने गमावली. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने इब्राहिम झादरानला क्लीन बोल्ड केले. चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीलाही बोल्ड केले. मार्को यानसेनने खरोटोला माघारी धाडलं. तर एनरिक नॉर्खियानेही आपल्या पहिल्याच षटकात यश मिळवले. तबरेझ शम्सीनेही पहिल्याच षटकात दोन विकेट घेतले. त्याने करीम जनात आणि नूर अहमद यांना पायचीत केले. नॉर्खियाने रशीद खानला बोल्ड केले. नवीन उल हक शम्सीचा बळी ठरला अन् अफगाणिस्तान ५६ धावांवर ऑल आऊट झाला.

07:04 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तान ऑल आऊट

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत अवघ्या ५६ धावांवर ऑल आऊट झाला आहे. अफगाणिस्तानची संपूर्ण फलंदाजी फळी फेल ठरली. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा एकही खेळाडू टिकू शकला नाही. आफ्रिकेला विजयासाठी १२० चेंडूत ५७ धावांचे आव्हान दिले आहे. मोठी धावसंख्या नसतानाही अफगाणिस्तानचे गोलंदाज कोणता चमत्कार घडवणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

07:00 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: रशीद खान क्लीन बोल्ड

नॉर्खियाच्या ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रशीद खान क्लीन बोल्ड झाला. रशीद खानने येताच चौकार लगावत आपली आक्रमक फलंदाजी सुरू केली. पण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर फार काळ मैदानात टिकू शकला नाही. ८ चेंडूत २ चौकारांसह ८ धावा करत बाद झाला. यासह अफगाणिस्तानने ११ षटकांत ९ बाद ५३ धावा केल्या.

06:52 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: मोहम्मद नूरही पायचीत

तबरेज शम्सीच्या १०व्या षटकात अफगाण संघाला दोन धक्के बसले. तिसऱ्या चेंडूवर करीम जनत पायचीत झाला तर पाचव्या चेंडूवर नुकताच आलेला नूर खातेही न उघडता बाद झाला. यासह अफगाणिस्तानने १० षटकांत ८ विकेट्स गमावत ५० धावा केल्या आहेत.

06:50 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानला सातवा धक्का

करीम-रशीदने संघाचा डाव सावरत संघाला ५० धावांपर्यंत नेले. पण १०व्या षटकातच अफगाणिस्तानला सातवा धक्का बसला आहे. तबरेज शम्सीच्या १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर करीम जनत पायचीत झाल्याने बाद झाला. त्याने एका चौकारासह १० चेंडूत ८ धावा केल्या.

06:48 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: रशीद-करीमची सावध फलंदाजी

६ विकेट्स गमावल्यानंतर मैदानात आलेल्या रशीद आणि करीम जनतने अफगाणिस्तानचा डाव सावरला आणि संघाला ५० धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला.

06:43 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तान

अफगाणिस्तानचा संघ पॉवरप्लेमध्ये ५ बाद २८ धावा करू शकला. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोसळला आणि झटपट सगळे फलंदाज झटपट माघारी परतले. सर्वच फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. तर गुलबदीनने ९ धावा आणि अझमतुल्ला १० धावा करत बाद झाला.

06:34 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानची सहावी विकेट

अफगाणिस्तानने लागोपाठ सहावी विकेट गमावली आहे, नॉर्खियाच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ओमरझाई झेलबाद झाला. अफगाणिस्तानच्या ३० धावाही पूर्ण केल्या नसताना संघाच्या ६ विकेट्स पडल्या आहेत.

https://x.com/MBENIWAL28/status/1806132009779232947

06:28 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानला पाचवा धक्का

५ षटकांत अफगाणिस्तानने ५ मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत. यान्सनच्या ५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर खारोटो झेलबाद झाला. यासह अफगाणिस्तानने ५ बाद २३ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर ओमरझाई आणि करीम जनतची जोडी आहे.

06:22 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: रबाडाच्या खात्यात दुसरी विकेट

रबाडाच्या चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबी गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झालेल्या इब्राहिम झादराननंतर नबीसुद्धा क्लीन बोल्ड झाला. यासह अफगाणिस्तानने ४ षटकांत ४ विकेट्स गमावत २० धावा केल्या.

06:17 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: इब्राहिम झादरान स्वस्तात बाद

चौथ्या षटकातील रबाडाच्या पहिल्याच चेंडूवर इब्राहिम झादरान क्लीन बोल्ड झाला. अफगाणिस्तानने झटपट ३ मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत. झादरान ५ चेंडूत २ धावा करत स्वस्तात बाद झाला.

06:15 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: गुलबदीन नईब क्लीन बोल्ड

अफगाणिस्तानकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला गुलबदीन नईबने झटपट धावा केल्या पण तो फार काळ मैदानात टिकू शकला नाही. यान्सनने तिसरे षटक टाकताना तिसऱ्याच चेंडूवर गुलबदीनला क्लीन बोल्ड केले. गुलबदीनने ८ चेंडूत २ चौकारांसह ९ धावा केल्या.

06:08 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानला मोठा धक्का

अफगाणिस्तान संघाला यान्सनने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला आहे. संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रहमानुल्ला गुरबाज ३ चेंडूत एकही धाव न करता बाद झाला. रीझा हेंड्रिक्सने शानदार झेल टिपला. रहमानने गेल्या सर्व सामन्यांमध्ये ७६, ८०, ६०, ४३ धावांची धुव्वाधार खेळी केली आहे. गुरबाजची ही विकेट अफगाणिस्तानसाठी महागडी ठरू शकते.

७६ (४५) वि युगांडा
८० (५६) वि न्यूझीलंड
६० (४९) वि ऑस्ट्रेलिया
४३ (५५) वि बांगलादेश
० (३) वि दक्षिण आफ्रिका

06:05 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: आफ्रिका-अफगाणिस्तान सामन्याला सुरूवात

दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान सामन्याला सुरूवात झाली आहे. अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान ही फलंदाजी जोडी मैदानात आहे. तर आफ्रिकेकडून यान्सेनकडून गोलंदाजीला सुरूवात.

05:40 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

05:40 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी

05:37 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक

टी-२० विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला नसून सारख्याच खेळाडूंसह खेळणार आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर रशीद म्हणाला, मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे. आनंद आहे की सलामीवीरांनी जबाबदारी उचलत आपली भूमिका पार पाडली आहे. तर मारक्रम म्हणाला, आम्हालाही पहिली फलंदाजी करायची होती. पण गोलंदाजीने सुरूवात करणंही चांगलं ठरेल. आम्ही फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकलो नाही, ती सुधारण्याचा प्रयत्न आहे.

05:26 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अफगाणिस्तान

इब्राहिम झादरान, रहमानुल्ला गुरबाज, (यष्टीरक्षक)/हजरतुल्ला झाझाई, अजमातुल्ला ओमरझाई, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, करीम जनात/मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), रशीद खान (कर्णधार), नंगेलिया खरोटे, नवीन उल हक, नूर अहमद, फजलक फारुकी

दक्षिण आफ्रिका

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, अँनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी

04:30 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: अफगाणिस्तानचा हा खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षण करताना रहमानउल्ला गुरबाजला पहिल्याच षटकातच गुडघ्याला दुखापत झाली आणि त्याने लगेचच मैदान सोडले. यानंतर मोहम्मद इशाक संपूर्ण सामन्यात बदली यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला. जर गुरबाज सेमीफायनल सामना खेळू शकला नाही तर हजरतुल्ला झाझाईला सलामीवीराची संधी मिळू शकते आणि इशाक यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळू शकतो.

03:27 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: सामना कुठे पाहाल?

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान उपांत्य सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, जे तुम्ही मोबाईलवर ‘विनामूल्य’ पाहू शकता.

02:27 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: पिचरिपोर्ट

ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील खेळपट्टी संतुलित आहे. गेल्या २० सामन्यांमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ११७ धावा आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे कारण या मैदानावर खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

01:39 (IST) 27 Jun 2024
SA vs AFG: हवामानाचा अंदाज

दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान तापमान २३.५६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि आर्द्रता सुमारे ९१% असेल. तर १.८९ मी/से वेगाने वारे अपेक्षित आहेत. तर संध्याकाळी म्हणजे सामन्याच्या वेळी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता नाही.

00:30 (IST) 27 Jun 2024
अफगाणिस्तानची गोलंदाजी

अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी जबरदस्त आहे. रशीद खान, मोहम्मद नबी, नूर अहमद हे उत्कृष्ट फिरकीपटू अफगाणिस्तानच्या ताफ्यात आहेत. रशीदच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं आफ्रिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये फजलक फारूकी आणि नवीन उल हकची जोडी आहे. नवीन हाणामारीच्या षटकांमध्येही भेदक गोलंदाजी करतो तर त्याचे स्लोअर बॉल फलंदाजांना चकवतात. फजलक फारूकी पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. याचसोबत तो यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधील सर्वाधिक विकेट्स घेणार खेळाडू आहे. गुलबदीन नईबने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकटाकी विजय मिळवून दिला होता.

23:29 (IST) 26 Jun 2024
हेनरिच क्लासन हा दक्षिण आफ्रिकेचा एक्स फॅक्टर

हेनरिच क्लासेन विरुद्ध अफगाणिस्तानचा संघ यांच्यातील लढत या सामन्याची दिशा ठरवेल. क्लासेनचा बॅकफूट पुल आणि स्लॉग स्वीप कोणत्याही फिरकीपटूची लय खराब करू शकतात. २०२३ च्या सुरुवातीपासून, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये स्पिनर्सविरुद्ध १८२.१२ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये फिरकीपटूंविरुद्ध किमान ४० डाव खेळलेल्या ४१ फलंदाजांपैकी क्लासेनचा स्ट्राइक रेट सर्वोत्तम आहे.

21:50 (IST) 26 Jun 2024
SA vs AFG Live Updates: दक्षिण आफ्रिकेला चोकर्स का म्हटलं जातं?

दक्षिण आफ्रिका एक उत्कृष्ट संघ आहे. या संघाने जागतिक क्रिकेटमधील अनेक मोठमोठे दिग्गज घडवले होते. पण महत्त्वाच्या करो या मरो सामन्यांमध्ये हा संघ नेहमी कमी पडतो. मोक्याच्या दडपणाच्या क्षणी कच खाणारा संघ असं दक्षिण आफ्रिकेला म्हटलं जातं, यावरूनच त्यांना चोकर्स हे नाव पडलं. आयसीसी ट्रॉफीचे जेतेपद पटकावून तब्बल २६ वर्षे झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदा तरी जेतेपद पटकावणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

21:48 (IST) 26 Jun 2024
SA vs AFG Live Updates: कोण मारणार बाजी?

यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे, पण अफगाणिस्ताननेही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करून स्पर्धेत मोठे अपसेट केले आहेत. अफगाणिस्तानने गट सामन्यात मध्ये दक्षिण आफ्रिकेला आपल्या जाळ्यात अडकवले होते पण त्यांनी विजय मिळवला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानचा संघ काय रणनीती आखतो यावर सर्वांच्या नजरा असतील.

T20 World Cup 2024, South Africa vs Afghanistan Semi Final 1 Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मधील उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.