T20 World Cup 2024, IND vs IRE : टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. ५ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि आयर्लंड आमनेसामने येतील. या सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत. अशा माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या प्लेइंग इलेव्हनमधून गावसकरांनी अर्शदीप सिंगला वगळले आहे, तर अष्टपैलू शिवम दुबेला संघात ठेवले आहे. याशिवाय गावस्कर यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्या फलंदाजीची पोझिशनही सांगितली आहे.
रोहित-विराट सलामी देणार –
दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. याशिवाय यशस्वी जैस्वालला तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. चौथे नाव सूर्यकुमार यादव आणि पाचवे नाव ऋषभ पंत. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून गावसकर यांनी संजू सॅमसनपेक्षा पंतला प्राधान्य दिले आहे आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्याची निवड केली आहे.
शिवम दुबेसह या गोलंदाजांना दिले स्थान –
‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकरांनी हार्दिक पंड्यानंतर रवींद्र जडेजाची सातव्या क्रमांकावर निवड केली आहे. याशिवाय त्यांनी शिवम दुबेला आठव्या स्थानी संधी दिली आहे. शिवम दुबेने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव सराव सामन्यात गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, तो बॅटने काही खास कामगिरी करु शकला नाही. गोलंदाजीत ‘लिटिल मास्टर’ने कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची निवड केली आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने उडवला युगांडाचा धुव्वा; ५ विकेट्ससह फारुकी चमकला
गावसकरांनी या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले –
सुनील गावसकरांनी जलदगती गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंगचा समावेश केलेला नाही. याशिवाय युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांनाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह सामन्यात प्रवेश करतात हे पाहणे बाकी आहे. विराट आणि रोहित करणार ओपनिंग, रोहित यशस्वीसोबत ओपनिंग करताना दिसणार का? या सामन्यानंतर भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
हेही वाचा – Sachin Tendulkar : ‘…तर सचिनने वर्ल्डकप न जिंकताच घेतली असती निवृत्ती’, पण ‘या’ माणसामुळे बदलला निर्णय
सुनील गावसकरांची प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.