भारत आणि झिम्बाब्वे संघात आज टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये ४२ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता झिम्बाब्वे संघाला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. त्याचबरोबर या सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या नावावर एका नवीन विक्रमाची भर घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्यकुमार यादवने २५ चेंडूचा सामना करताना ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. या अर्धशतकाच्या जोरावर सूर्यकुमार यादवने एक नवा विक्रम नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे.

युवराज सिंगने २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध डर्बन येथे केली होती. त्याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. ज्याने २०२१ मध्ये स्कॉटलंड विरुद्ध दुबई येथे १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर आता हा विक्रम सूर्याने २३ चेंडूत अर्धशतक करुन आपल्या नावी केला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : टी-२० मध्ये बाबर-रिझवानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

टी-२० विश्वचषक मध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू (चेंडूत)

युवराज सिंग १२ चेंडूत विरुद्ध इंग्लंड – डर्बन, २००७
केएल राहुल १८ चेंडूत विरुद्ध स्कॉटलंड – दुबई, २०२१
युवराज सिंग २० चेंडूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – डर्बन २००७
सूर्यकुमार यादव २३ चेंडूत विरुद्ध झिम्बाब्वे- मेलबर्न २०२२