Suryakumar Yadav Loses The Number 1 Spot in ICC T20I Rankings: टी-२० विश्वचषक २०२४ दरम्यान आयसीसीने नवीन टी-२० रँकिंग जाहीर केली आहे. यावेळी रँकिंगमध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे भारताचा सूर्यकुमार यादव जो बराच काळ पहिल्या क्रमांकावर होता. या पहिल्या स्थानावरून आता सूर्यकुमार घसरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले पण या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने सूर्यकुमार यदवला धक्का दिला.

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवला मागे सारत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड टी-२० मध्ये नंबर वन बॅट्समन बनण्यात यशस्वी ठरला आहे. यावेळी त्याने एकाच वेळी 4४ स्थानांनी झेप घेतली आहे. आता ट्रॅव्हिस हेडचे रेटिंग ८४४ गुण झाले आहे. ट्रॅव्हिस हेड गेल्या काही काळात पहिल्या दहामध्येही नव्हता, पण आता तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारताचा सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. सूर्याचे रेटिंग सध्या ८४२ग गुण आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा फलंदाज यांच्यात फक्त दोन रेटिंग गुणांचा फरक आहे. हा फरक सूर्या सहज भरून काढू शकतो पण यासाठी त्याला मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

इंग्लंडचा फिल सॉल्ट, पाकिस्तानचा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे खेळाडूही एक-एक घर खाली घसरले आहेत. इंग्लंडच्या फिल सॉल्टला एका स्थानाचा फटका बसला आहे. त्याचे रेटिंग आता ८१६ गुण आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. तो ७५५ च्या रेटिंगसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ७४६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा – “भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”

ताज्या आयसीसी टी-२० रँकिंगमधील टॉप-५ फलंदाज
ट्रेव्हिस हेड – ऑस्ट्रेलिया -८४४ गुण
भारत – सूर्यकुमार यादव – ८४२ गुण
इंग्लंड – फिल सॉल्ट – ८१६ गुण
पाकिस्तान – बाबर आझम – ७५५ गुण
पाकिस्तान – मोहम्मद रिजवान – ७४६ गुण