Suryakumar yadav win Best Fielder Medal: सूर्यकुमार यादवच्या एका कॅचने संपूर्ण सामना फिरला आणि प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याने सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेत भारताला टी-२० ट्रॉफी जिंकून दिली. त्याच्या शानदार झेलमुळे तो सामन्यातील बेस्ट फिल्डर ठरला. सूर्याचा तो झेल इतर कोणत्या खेळाडूंना नामांकन न देताच त्याला थेट विजेता घोषित केले.

भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. भारताचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी खेळाडूंना संबोधित केलं. अंतिम सामन्याच्या बेस्ट फिल्डरला मेडल देण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. जय शाह यांनी स्वत: त्याला पदक प्रदान केले. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William O Rourke in Pune test
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरच्या अचूक थ्रोवर रवींद्र जडेजाने हुशारीने विल्यम ओ रुकला केले रनआऊट, VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Virat Kohli Tim Southee Fighting Video Goes Viral in India New Zealand 2nd Test Pune Watch
IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
Rishabh Pant Stump Mic Video Goes Viral As He Planned to Out Ajaz Patel with Washington Sundar Backfires IND vs NZ
IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी समजते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
Ayush Badoni picked up a sensational flying catch
Ayush Badoni : खेळाडू आहे की सुपरमॅन! आयुष बदोनीने घेतलेला चित्तथरारक झेल पाहून सर्वच अवाक्, पाहा VIDEO
Kagiso Rabada completes 300 Test wickets
Kagiso Rabada : कागिसो रबाडाने केला विश्वविक्रम! बांगलादेशविरुद्ध नोंदवला ‘हा’ खास पराक्रम
Ranji Trophy 2024 -25 Mumbai beats Maharashtra by nine wickets
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय
Virat Kohli and Anushka Sharma attended Krishna Das Kirtan Video viral
Virat Kohli : विराट कोहली भारताच्या पराभवानंतर रमला कीर्तनात, पत्नी अनुष्काबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?

सूर्याचा मॅचविनिंग कॅच


डेव्हिड मिलर भारतासाठी घातक ठरत होता. २० षटकापर्यंत तो मैदानावर होता म्हणजे तो मोठा फटका खेळू शकतो याची सर्वांनाच कल्पना होती. पण त्यानंतर हार्दिक पंड्या शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आला. जिथे ६ चेंडूत १६ धावा हव्या होत्या. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने बॅट स्विंग करून चेंडू सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला, पण सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेत डेव्हिड मिलरला बाद केले इतकेच नव्हे तर भारताच्या विजयाची शक्यताही वाढवली. सूर्याने धावत येत झेल टिपला पण तो त्याला सीमारेषेबाहेर पाय जाणार हे त्याला कळताच त्याने चेंडू फेकला आणि पुन्हा येऊन तो टिपला आणि भारताचा विजय पक्का केला.

हेही वाचा – Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का

शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने कागिसो रबाडाचा झेल टिपत भारताचा विजय आणखी पक्का केला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ९ धावांची गरज होती पण शेवटच्या चेंडूवर फक्त एक धाव आली, त्यामुळे टीम इंडियाला ७ धावांनी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावण्यात यश आले.

डेव्हिड मिलरच्या या शानदार झेलसाठी सूर्यकुमार यादव सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला. ज्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह स्वतः भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांना पदक प्रदान केले. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.