Suryakumar Yadav Special Post For Captain Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद आपल्या नावे केले आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच भारतीय संघाचे फोटो, व्हीडिओ पोस्ट होत असून चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. खेळाडूही या विजयानंतर पोस्ट फोटो शेअर करत आहेत. पण वर्ल्डकप संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासाठी खास पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीचे जेतेपद पटकावले जिंकली. शनिवारी, २९ जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनंतर टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे. त्यानंतर सूर्यकुमारने भारताला स्पर्धा जिंकून देण्यात मदत केल्याबद्दल रोहितचे सूर्यकुमारने आभार मानले.
रोहितने रोहितचा विजयानंतरचा सेलिब्रेट करतानाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले “कॅप्टन रोहित, सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी करायची ते तू दाखवलंस, त्याबद्दल तुझे आभार”
अंतिम सामन्यात भारतीय संघात प्रथम फलंदाजी करत असताना रोहित लवकर बाद झाला, पण विराट कोहलीच्या ५९ चेंडूत ७६ धावांच्या खेळीमुळे भारताला ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. अक्षर पटेलनेही चांगली खेळी केली, पण त्याचे अर्धशतक मात्र थोडक्यासाठी हुकले. यानंतर गोलंदाजी करताना सुरूवातीपासून वर्चस्व राखलेल्या सामन्यात भारतीय संघ एका क्षणाला पिछाडीवर आला पण पुन्हा एकदा भारताच्या गोलंदांजानी भारताला सामना जिंकवून दिला आणि संघाला विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळवून दिली.
Captain Ro ?
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) July 1, 2024
Thank you for showing us how it’s done! ???
The Absolute Best ? pic.twitter.com/6G6f06uDhs
हेही वाचा – ICC ने T20 WC नंतर जाहीर केली ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’, भारताचे तब्बल ६ खेळाडू, मात्र या दिग्गजाचं नाव नाही
भारताच्या विजयात सूर्यकुमार यादवनेही मोठी भूमिका बजावली. अखेरच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला तर समोर विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर होता. पंड्याच्या फुल टॉस चेंडूवर त्याने मोठा फटका मारला पण चेंडू हवेत उंच गेला पण सूर्याने मोठ्या कष्टाने धावत येऊन तो झेल टिपला आणि सामना भारताच्या बाजूने फिरला. सूर्यकुमारच्या या कॅचची सगळीकडे अजूनही चर्चा सुरू आहे.