Suryakumar yadav Statement on Stunning Catch: टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत भारतीय संघ वेस्ट इंडिजमधून ट्रॉफीसह भारतात परतणार आहे, तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील परफेक्ट संघाने ही मोहिम फत्ते करून दाखवली आहे. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर हा विजय मिळवला आहे. या विजयाचे अनेक नायक आहेत. पण सूर्यकुमार यादवने टिपलेल्या झेलची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या सूर्याने सीमारेषेवर असा काही झेल टिपला की सर्वांना आश्चर्याचा आणि सुखद धक्काही बसला कारण मिलरची विकेट संघासाठी खूपच महत्त्वाची होती.

सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये डेव्हिड मिलरच्या मॅच-विनिंग कॅचबद्दल उघडपणे बोलतो. इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने हा खुलासा केला. मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या फुल टॉस चेंडूवर मोठा फटका मारला, हा चेंडू हवेत उंच उडाला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे सूर्यकुमार सीमारेषेच्या जवळ होता. क्षणभर असे वाटत होते की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण सूर्यकुमारने कमालीची कामगिरी करत अप्रतिम झेल घेत संघाला विजय मिळवून दिला.

suraj chavan will get new home by next diwali
सूरज चव्हाण ‘या’ दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार! भर सभेत अजित पवारांनी दिला शब्द; म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट
Zeenat Aman And Raj Kapoor
राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमात घ्यावं यासाठी झीनत अमान यांनी लढवली होती युक्ती; म्हणाल्या, “मी डिंकाने माझ्या चेहऱ्यावर…”
Nanand Bhabhi Relation
Nanand Babhi Relation : “भारतीय समाजात नणंद-भावजयांचं नातं खास”, न्यायाधीशांकडून मिश्किल टीप्पणी!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
Shah Rukh Khan And Bhau Kadam
“शाहरुख खानसमोर जेव्हा शाहरुख साकारला तेव्हा…”, भाऊ कदम यांनी सांगितली आठवण; म्हणाले, “ती परीक्षाच…”

हेही वाचा – IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO

सूर्यकुमार झेलबद्दल म्हणाला, “आता हे सांगणं सोपं आहे, पण त्यावेळी असं वाटलं की चेंडू नाही ट्रॉफी सीमारेषा ओलांडून पलीकडे जात आहे. त्यावेळेला मला जे शक्य होतं ते सर्व केलं आणि त्या वेळी वारा देखील एक चांगला घटक होता. त्यामुळे मला थोडी मदत मिळाली. तसेच, आम्ही आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासोबत भरपूर सराव केला आहे आणि असे अनेक झेल यशस्वीपणे टिपले आहेत. त्यामुळे जेव्हा सामन्यात एवढा मोठा क्षण होतो, तेव्हा प्रसंगावधानत आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते.”

सूर्यकुमारने असेही सांगितले की एक क्षण असा आला की जेव्हा त्यांना वाटले की सामना आता त्यांच्यापासून दूर जात आहे. मात्र, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सामना पुन्हा भारताच्या बाजूने फिरवू शकतात, असा त्याला विश्वास होता.

हेही वाचा – IND vs SA: “मी आदल्या रात्री…”, रोहित शर्माचे जेतेपदानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, “मला कोणत्याही परिस्थितीत ट्रॉफी जिंकायचीच होती”

“मला वाटतं की हा खूपच मजेदार खेळ आहे. शेवटच्या षटकातील चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोवर उत्कंठा वाढवत राहणारा हा खेळ आहे. असचं होतं, मी खरं सांगतोय. काही क्षणी आम्हाला वाटले की आमच्या विजयात फार अंतर निर्माण झाले आहे. पण गेल्या दोन महिन्यात दोन वर्षांत खासकरून टी-२० वर्ल्डकप २०२२ नंतर केलेल्या मेहनतीचा विचार मनात सतत सुरू होता. सामन्यातील शेवटच्या ५ ते ६ षटकांमध्ये माझ्या मनात हेच चालू होतं. तेव्हा बुमराहची २ आणि अर्शदीपची १ षटकं होतं आणि त्यांने सातत्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मला विश्वास होता की हे लोक सामन्याला कलाटणी देऊ शकतात,” असं सूर्यकुमार म्हणाला.