Suryakumar Yadav Statement on Rohit sharma about Catch: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत ट्रॉफी उंचावली. भारताला विजयाच्या दिशेने नेणारा या सामन्यातील प्रत्येक क्षण सर्वांच्या कायम लक्षात राहणार आहे. त्यातील मोठा आणि चर्चेचा ठरलेला क्षण म्हणजे सूर्यकुमार यादवचा झेल. सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ डेव्हिड मिलरचा एक अनपेक्षि झेल यशस्वीपणे टिपला. सूर्याच्या या झेलनंतर त्याच्या व्हॉट्सअॅपवर तब्बल १०१४ मेसेज होते. इतके मेसेज याआधी त्याला कधीच आले नव्हते. भारताच्या या शानदार विजयानंतर आणि सूर्याच्या त्या आश्चर्यकारक झेलची सर्वत्र चर्चा आहे. या झेलबद्दल सांगताना एक नवीन खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

सूर्याचा अविश्वसनीय झेल

अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिलाच चेंडू हार्दिक पंड्याने लोअर फुल टॉस टाकला. या चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला आणि चेंडू हवेत उंच गेला आणि षटकारासाठी जाणार असे वाटत होते. पण सीमारेषेबाहेर जाणारा हा चेंडू सूर्याने धावत येत टिपला, त्यानंतर त्याचा तोल जातो हे कळताच त्याने सीमारेषेबाहेर हवेत चेंडू उडवला आणि पुन्हा तो चेंडू टिपला. या सूर्याच्या यशस्वी झेलसह भारताने सामन्यात दणदणीत पुनरागमन केले. पण हा झेल टिपताना सूर्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, हे त्याने सांगितले.

हेही वाचा – VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमार यादवने या झेलबद्दल सांगितले, “आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप सरांनी सांगितले आहे की सूर्या, विराट कोहली, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी नेहमी हॉटस्पॉट भागात क्षेत्ररक्षणसाठी उभं राहायचं, जिथे चेंडू जाण्याची सर्वाधिक शक्यता असते. जो झेल मी मैदानात टिपला तसा झेल यशस्वीपणे टिपण्यासाठी वाऱ्याचा वेग पाहत अनेकदा सराव केला आहे. अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात मी थोडा वाईड अँगलला उभा होतो, कारण हार्दिक आणि रोहित शर्मा यांनी वाइड यॉर्करसाठी फिल्डिंग सेट केली होती आणि मिलरने सरळ फटका मारला होता. काहीही करून हा झेल टिपायचा, हे मी डोक्यात पक्क केलं होतं.”

हेही वाचा – “नोव्हेंबरमधील त्या फोन कॉलसाठी थँक्यू रोहित…”, द्रविड यांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर कॅप्टनचे आभार का मानले? सूर्यकुमारने केला खुलासा

सूर्याने हा झेल टिपतानाचा रोहित शर्मा आणि त्याच्यामधील मैदानावरील प्रसंग सांगताना म्हणाला, “रोहित शर्मा सहसा कधीच लाँग ऑनवर फिल्डिंगसाठी उभा राहत नाही पण त्या अखेरच्या षटकात रोहित तिथे होता. त्यामुळे चेंडू जेव्हा माझ्या दिशेने येत होता, तेव्हा मी एका सेकंदासाठी रोहितकडे पाहिलं आणि रोहितने माझ्याकडे पाहिलं. तेव्हाच मी धावायला सुरूवात केली आणि माझं लक्ष्य एकच होतं तो चेंडू पकडायचा. जर रोहित शर्मा तिथे जवळ असता तर मी बाहेर चेंडू फेकला तेव्हा त्याच्या दिशेने फेकणार होतो. पण तेव्हा रोहित जवळपास दिसला नाही. त्या ४-५ सेकंदात जे काही घडलं ते मी शब्दात मांडूच शकत नाही.”

सूर्याच्या त्या कॅचवर लोकांची प्रतिक्रिया पाहून सूर्या भारावला, याबद्दल तो म्हणाला, “माझ्या त्या झेलवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासाठी मला लोक कॉल करत आहेत, मेसेज करत आहेत, माझ्या फोनवर एक हजाराहून अधिक न वाचलेले व्हॉट्सॲप मेसेज आहेत. सोशल मीडियावर सगळीकडे त्या कॅचचा व्हीडिओ आहे, चर्चा आहे. सामन्यातील त्या ५ सेकंदांमध्ये मी त्या ठिकाणी होतो, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे.”

हेही वाचा – IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

सूर्याने यशस्वीपणे झेल टिपला आहे याबद्दल त्याला खात्री होती हे सांगताना सूर्या पुढे म्हणाला, “जेव्हा मी चेंडू बाहेर फेकला आणि पुन्हा झेल घेतला तेव्हा मला माहित होते की सीमारेषेचा दोरीला माझा स्पर्श झालेला नाही. माझं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं की जेव्हा मी चेंडू बाहेर फेकून सीमारेषेच्या पलीकडे पाय टाकला तेव्हा माझ्या पायाने दोरीला स्पर्श केलेला नसू दे. मला माहित होतं की मी एक योग्य झेल टिपला आहे. त्यावेळेस काहीही होऊ शकले असते. जर चेंडू षटकारासाठी गेला असता तर ५ चेंडूत १० धावा असं समीकरण झालं असतं. आम्ही तेव्हाही सामना जिंकलो असतो, पण समीकरण बदललं असतं.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav statement on rohit sharma about david miller catch in t20 world cup final said was going to throw the ball to him bdg
First published on: 02-07-2024 at 17:18 IST