Suryakumar yadav statement on His Batting in WC with No 1 Batter in T20: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीतील सामने खेळण्यासाठी भारतीय संघ आता वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. अमेरिकेत सर्व गट सामने सामने खेळलेल्या टीम इंडिया फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करू शकली नाही, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खेळपट्टी फलंदाजीसाठी अजिबातच अनुकूल नव्हती. आता याबाबत टी-२० रँकिंगमध्ये जगातील नंबर १ खेळाडू असलेल्या सूर्यकुमार यादवचे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्याने सांगितले की, अशा खेळपट्ट्यांवर धावा काढण्यासाठी तुम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी बदलावी लागेल. भारतीय संघाला सुपर८ फेरीतील सामने अनुक्रमे बार्बाडोस, अँटिगा आणि सेंट लुसिया येथे होणार आहेत, जेथे खेळपट्ट्यांवर धावा काढणे थोडे सोपे होऊ शकते. भारताचा सुपर८ मधील पहिला सामना २२ जूनला अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे. तर पुढील सामना बांगलादेशविरूद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाईल.

हेही वाचा – रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”

सूर्यकुमार यादव हा गेली दोन वर्ष टी-२० मधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. परंतु टी-२० विश्वचषकातील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. पण अमेरिकाविरूद्धच्या सामन्यात ५९ धावा करून सूर्यकुमार भारताला विजय मिळवून देत माघारी नाबाद परतला. जेव्हा भारताची २ बाद १० धावा अशी अवस्था झाली तेव्हा सूर्याने त्याच्या मोठ्या फटकेबाजीला आवर घालत संयमी खेळी केली. न्यूयॉर्कच्या अवघड खेळपट्टीवर सूर्यकुमारने अमेरिकेविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले. तीन विकेट लवकर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने संयमी खेळी करत ४९ चेंडूत नाबाद ५० धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वााचा – “माझा भाऊ थोडा चांगला असता…” वासिम जाफर मायकल वॉनला उद्देशून पाहा काय बोलून गेला? VIDEO व्हायरल

अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर८ सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये संघाच्या सराव सत्रानंतर दिलेल्या आपल्या वक्तव्यात सूर्यकुमार यादव म्हणाला की, जर तुम्ही गेल्या एक-दोन वर्षांपासून सतत पहिल्या क्रमांकावर असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड द्यावे लागेल. तुम्हाला कसे खेळायचे हे माहित असले पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही संघाच्या गरजेनुसार खेळले पाहिजे. जे तुम्हाला एक चांगला फलंदाज बनवते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा खेळपट्टीवर वेग नसतो आणि जेव्हा तुमची खेळण्याची पद्धत प्रतिस्पर्ध्याला माहीत असते, तेव्हा तुमच्यासाठी धावा काढणे सोपे नसते. त्यावेळेस खूप हुशारीने फलंदाजी करावी लागते जेणेकरून मोठा डाव खेळता येईल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav statement on sluggish batting form in t20 world cup 2024 with number 1 batter in t20 bdg
Show comments