Suryakumar Yadav Reveals First Reaction To Virat Kohli’s Early Dismissal: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सध्या टी-२० विश्वचषकात धावा काढण्यासाठी झगडताना दिसत आहे. गुरुवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर८ सामन्यादरम्यान विराटने आपल्या डावाची सुरुवात चांगली केली पण २४ चेंडूत २४ धावा करून रशीद खानने त्याला बाद केले. पण सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरला आणि अर्धशतक झळकावून आपल्या संघाला २० षटकांत १८१ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. अफगाणिस्तानचा डाव सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमारने विराट कोहलीच्या विकेटनंतरचा एक किस्सा सांगितला.

सूर्यकुमार यादवने झंझावाती शतक झळकावत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. सूर्यकुमार जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताने दोन विकेट्स गमावून५४ धावसंख्या होती. ऋषभ पंत आणि रोहित शर्मा मैदानात बाद होऊन माघारी परतले होते. विराट कोहल आणि सूर्याला भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. पण पुढच्या षटकात विराट बाद झाला. यानंतर सूर्याने जबाबदारी घेत डाव सावरला. पण तत्त्पूर्वी विराट बाद झालेला पाहून तोही टेन्शनमध्ये आला होता.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

मॅचविनिंग खेळी केल्यानंतर सूर्या म्हणाला, “मी याचाच सराव केला आहे, मला (७-१५ षटकांदरम्यान) फलंदाजी करण्याचा मी आनंद लुटतो, हा सर्वात कठीण टप्पा आहे जिथे विरोधी गोलंदाज धावांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या षटकांमध्ये जबाबदारी घेत खेळायला मला आवडते.

विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्याची प्रतिक्रिया काय होती, हे विचारल्यानंतर तो म्हणाला, “विराट कोहली बाद झाल्याचे मी पाहताच मी अधिक जोरजोरात च्युइंग गम चघळायला सुरूवात केली. पण मला माहित होतं की अशा परिस्थितीत मी यापूर्वीही फलंदाजी केली आहे आणि या दरम्यान कशी फलंदाजी करायची हे माहित होतं. यानंतर डावखुरा फलंदाज मैदानात येईल त्यामुळे धावा करणं सोपं जाईल हे माहित होतं. मी स्वत:वर विश्वास ठेवला, माझ्या खेळावर विश्वास ठेवला आणि सामना पुढे नेला.”

हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण

अर्धशतकी खेळीनंतर सूर्यकुमारचे रोहित शर्मावर मोठे वक्तव्य

पुढे रोहित शर्माबद्दल सांगताना म्हणाला, मी त्याच्या (रोहित शर्मा) सोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, त्याला माझा खेळ माहित आहे, म्हणून तो आरामात बसून त्याचा आनंद घेत असतो.

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतरही सूर्याच्या वक्तव्याने सर्वांची मन जिंकली. ‘या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणत्याही गोलंदाजाला देण्यास माझा आक्षेप नाही. प्रथमच कोणत्यातरी भारतीय फलंदाजाला या टूर्नामेंटमध्ये हा पुरस्कार मिळाला. यानंतर अनेक फलंदाज या पुरस्काराचे मानकरी ठरतील अशी अपेक्षा आहे. माझ्या फलंदाजीबद्दल बोलायचं तर सत्य हे आहे की त्यामागे खूप मेहनत आणि सराव आहे. जेव्हा मी मैदानात जातो तेव्हा मला काय करायचे आहे याबद्दल मला आधीच स्पष्टता असते. ”