Suryakumar Yadav Catch Video With New Angle: सूर्यकुमार यादवने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब करणारा झेल घेतल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाले आहेत. सूर्याने घेतलेला हा झेल इतका आगळा वेगळा होता की अनेकांना यावर विश्वासही बसत नाहीये. अर्थात अनेकजण कौतुकाने या कॅचला अविश्वसनीय म्हणत असले तरी काहींना मात्र यात चीटिंगचा अँगल दिसून येतोय. स्वतः दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सूर्याने घेतलेला कॅच हा नियमाला धरूनच होता असे मान्य केले. पण भारतातच काही स्वयंघोषित क्रिकेटतज्ज्ञ, “सूर्याने मुद्दामच सीमारेष पुढे ढकलली”, “उडी घेताना सीमारेषेला स्पर्श केला होता”, असे कयास बांधत आहेत. या सगळ्या अंदाजांना खोटं सिद्ध करणारा एक नवा व्हिडीओ सध्या समोर आला आहे जो पाहून सूर्याने घेतलेली कॅच कशी व किती परफेक्ट होती हे सिद्ध होतंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा