टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आहेत. मात्र, दोन्ही संघांना उपांत्य फेरीत एकमेकांशी खेळावे लागणार नाही. या विश्वचषकात सूर्यकुमार यादव भारतासाठी एक्स फॅक्टर ठरला आहे. त्याने टीम इंदियातील दीर्घकाळ चाललेला चौथ्या क्रमांकाचा शोध त्याने संपवला आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याने विस्फोटक फलंदाजी केली आहे. सुर्या जेव्हा क्रिजवर असतो तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या फलंदाजीचे वेड लागते. त्याच्या फलंदाजीने अनेक दिग्गज खेळाडूंना त्याचे वेड लावले आहे. आता मॅथ्यू हेडननेही त्याच्या फलंदाजीबद्दल भाष्य केले आहे.
महान ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे वर्तमान मार्गदर्शक, मॅथ्यू हेडन यांचा असा विश्वास आहे की टी२० क्रिकेटमध्ये नेहमीच ताकद नसते आणि सूर्यकुमार सारख्या उपखंडातील खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते सर्व कौशल्याने आणि क्षमतेने मोठे फटके खेळतात आणि इतर संघांसाठी ते धोक्याचे ठरू शकतात. खेळाच्या सर्वात लहान टी२० क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांच्या पॉवर हिटर्सचे वर्चस्व आहे परंतु हेडनने आपल्या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी सूर्यकुमारचे उदाहरण दिले आणि सांगितले की ते योग्य संतुलन शोधण्यावर अवलंबून आहे.
सूर्यकुमार यादवचे मॅथ्यू हेडनने केले कौतुक
मॅथ्यू हेडनने बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी सांगितले की, “टी२० क्रिकेटमधील पॉवर गेमवर अजूनही काम केले जात आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेवर नजर टाकली तर मला वाटतं मधल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत सुंदर खेळ दाखवणारा, चौफेर फटके खेळण्याची क्षमता असलेला सूर्यकुमारसारखा खेळाडू आपल्या खेळात नावीन्य आणून दुसऱ्या संघांसाठी धोक्याचा ठरला आहे.”
सूर्यकुमारने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या २५ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी करून एमसीजीमध्ये उपस्थित सुमारे ८२ हजार प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या काळात त्याने काही चांगले फटकेही खेळले. “म्हणून ही नेहमीच शक्तीची बाब नसते,” हेडन म्हणाला. उपांत्यफेरीतील सामने जवळ आले आहेत. मला वाटते की या स्पर्धेत बरेच संघ शिल्लक आहेत कारण त्यांनी विकेट्स वाचवल्यानंतर आणि खेळात नाविन्यपूर्ण बदल केल्यानंतर संतुलन निर्माण केले आहे आणि त्यामुळे मधल्या फळीवर दबाव निर्माण झाला नाही.” तो म्हणाला, “ऑस्ट्रेलिया हे याचे एक उत्तम उदाहरण आहे परंतु ते नवीन चेंडूचा चांगला सामना करू शकले नाहीत आणि त्यामुळे मधल्या फळीवर दबाव आला.” गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर-१२ टप्प्याच्या पुढे प्रगती करू शकला नाही. या संघाने ग्रुप१मध्ये सात गुण मिळवत तिसऱ्या स्थानवर राहिले.