टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये सध्या कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुपर ८ सामने सुरू होण्याआधी ब गट कमालीचा स्पर्धात्मक असल्याचं बोललं जात होतं. मात्र, या फेरीच्या शेवटच्या सामन्यांपर्यंत येता-येता अ गटातच जास्त घडामोडी घडताना दिसत आहेत. अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारून अ गटातून सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या संघांचं गणित पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे सुपर ८ फेरीतील आत्तापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून अ गटात अव्वल असणाऱ्या टीम इंडियालाही सेमीफायनलमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलंय ‘अ’ गटात?

अ गटातल्या संघांचे गुण सध्या कमालीचे गुंतागुंतीचे झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतानं २ पैकी २ सामने जिंकून ४ गुण खिशात घातले आहेत. भारताचा नेट रनरेट २.२४५ म्हणजे गटात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियानं २ पैकी एक सामना जिंकला असून त्यांच्या खात्यात २ गुण आहेत. अफगाणिस्ताननंही २ पैकी १ सामना जिंकला आहे. मात्र, त्याचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा बराच कमी आहे. चौथ्या स्थानी असणाऱ्या बांगलादेशनं २ पैकी दोन्ही सामने गमावले आहेत.

आज अ गटातले दोन सामने

सुपर ८ फेरीतले शेवटचे दोन सामने अ गटातल्याच चार संघांमध्ये होणार आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी तर अफगाणिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यांमध्ये नेमके काय निकाल लागतात? त्यावरून अ गटातून सेमीफायनलमध्ये जाणारे संघ ठरणार आहेत. भारताचा सेमीफायनलमधला प्रवेश निश्चित मानला जात असला, तरी अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे भारतासाठीही सुपर ८ मधूनच बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

IND vs AUS : ‘आम्ही पूर्णपणे तयार आहोत…’, कर्णधार मिचेल मार्शने भारताला दिले आव्हान; म्हणाला, ‘अवघ्या ३६ तासांत…’

…तर भारताला गाशा गुंडाळावा लागणार!

भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यामध्ये आजच्या सामन्यांमधली आकडेमोड आडकाठी करू शकते. भारताचा नेट रनरेट सर्वाधिक आहे. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियानं भारताचा किमान ४१ धावांनी पराभव केला आणि त्याचवेळी अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८३ धावांनी विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान या दोघांचे गुण भारताइतकेच म्हणजे ४ होतील आणि नेट रनरेट भारतापेक्षा जास्त होईल. या स्थितीत भारत बाहेर पडून ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये जातील.

नेट रनरेट सर्वात महत्त्वाचा!

आज भारत व अफगाणिस्तान या संघांनी आपापले सामने जिंकले, तर ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील. पण ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला तर अफगाणिस्तानसह या तिन्ही संघांचे गुण समान होतील. त्यावेळी नेट रनरेटवर सगळा खेळ असेल. सर्वाधिक नेट रनरेट असणारे दोन संघ सेमीफायनलमध्ये जातील. या स्थितीत भारताचा नेट रनरेट सर्वाधिक असल्यामुळे टीम इंडिया सहज सेमीफायनलमध्ये जाईल.

AUS vs AFG : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर ब्राव्होने केला ‘चाम्पिअन वाला डान्स’, बसमधील संघाचा VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियासाठी कसं असेल गणित?

ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल गाठण्यासाठी भारताविरोधात मोठा विजय आवश्यक आहे. पण तसं न झाल्यास ऑस्ट्रेलियानं फक्त एका धावेनं विजय मिळवला तर अफगाणिस्तानला बांगलादेशवर ३६ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. याउलट ऑस्ट्रेलियानं धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध १५.४ षटकांमध्येच सामना जिंकावा लागेल. तेव्हा ऑस्ट्रेलिया भारतासह सेमीफायनल गाठू शकेल.

बांगलादेशलाही सेमीफायनल गाठण्याची संधी!

दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका विजयानं अ गटात मोठी उलथापालथ केली आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत एकही सामना न जिंकलेल्या बांगलादेशलाही सेमीफायनल गाठण्याची संधी असेल. भारतीय संघानं किमान ५५ वा त्याहून अधिक धावांनी ऑस्ट्रेलियाला हरवल्यास त्यानंतर बांगलादेशला अफगाणिस्तानला ३१ किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करावं लागेल. या स्थितीत बांगलादेशचा रनरेट ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानपेक्षा जास्त होईल आणि गुणसंख्या समान होईल. त्याामुळे बांगलादेश सेमीफायनलमध्ये जाऊ शकेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T 20 world cup group a point table calculation will india clear semi finals pmw