भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने ग्रुप २ मध्ये अव्वलस्थान कायम राखत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. टीम इंडियाला सुपर-१२ फेरीत फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण याशिवाय भारतीय संघाने पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशला पराभूत केले होते. मात्र, भारतीय संघ १० नोव्हेंबरला ॲडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगवान गोलंदाजांचे सर्वात मोठे अडसर म्हणजे पायामध्ये क्रॅम्प आणि ताठ पाठ हे प्रत्येक क्रीडापटूचे स्पर्धेपूर्वीचे शत्रू आहेत. ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जात आहे, त्यामुळे आधीच वेगवान गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्ट्या असे रिपोर्ट्स पुढे येऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक संघ त्यांच्या वेगवान गोलंदाजांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेऊ लागले आहेत. त्यातच भारतीय क्रिकेट संघाने आपल्या वेगवान गोलंदाजांना आराम मिळण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

२००७ नंतर भारतीय संघ टी२० विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण करेन अशी आशा सर्वांना आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळायचे आहेत. त्यामुळे खेळाडूंना बराच प्रवास करावा लागत आहे. मात्र, कर्णधार आणि प्रशिक्षकाव्यतिरिक्त संघातील वरिष्ठ खेळाडूंना विमान प्रवासादरम्यान बिझनेस क्लासची तिकिटे मिळतात. टीम इंडियाचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कौतुकास्पद पाऊल उचलत वेगवान गोलंदाजांना बिझनेस क्लासची सिट दिली आणि स्वतः हा दुसऱ्या विमानाने प्रवास केला.

हेही वाचा :   T20 World Cup: ‘हा खेळाडू अपयशी ठरला तर…’ टीम इंडियाच्या फलंदाजीवर सुनील गावसकर नाराज

संघ व्यवस्थापनाने उचलले मोठे पाऊल

“स्पर्धेपूर्वीच आम्ही ठरवले होते की वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक वेळ मैदानावार घालवायचा असतो. त्यामुळे त्यांना पाय स्ट्रेच करण्यासाठी अधिक जागा मिळावी यासाठी हे केले गेले,” असे एका सपोर्ट स्टाफने सांगितले. जेव्हा भारतीय संघ उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास ऍडलेडला पोहोचला तेव्हा सपोर्ट स्टाफने ही माहिती माध्यमांना दिली.

हेही वाचा :   T20 World Cup: पंत की कार्तिक इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात रवी शास्त्रींच्या मते कोण खेळणार? जाणून घ्या

सततचा सराव, प्रवास यामुळे भारतीय गोलंदाज अधिक थकत आहेत आणि त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी याकरिया द्रविडसह सीनियर खेळाडूंनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संघातील या सीनियर खेळाडूंनी प्रवासादरम्यान स्वतःचं बिझनेस क्लासचं सीट अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांना दिले. ”या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गोलंदाजांवरील वर्क लोड आणि सततचा प्रवास यावर आम्ही चर्चा केली होती. सराव, सामने आणि प्रवास याचा ताण गोलंदाजांच्या पायावर पडतो, त्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती हवी आहे,”असे सपोर्ट स्टाफच्या सदस्याने सांगितले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc 2022 during the tour in australia the indian coach and captain are giving their business class seats to the fast bowlers