टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघांची आतापर्यंतची वाटचाल शानदार झाली आहे. सुपर- १२ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सोडला तर इतर सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाने उत्तम कामगिरी केली आहे. पहिला उपांत्य सामना जिंकून पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता पाकचा मुकाबला १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. त्याआधी आज ऐतिहासिक ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.

भारत-इंग्लंड सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर प्रश्न विचारला. “ सूर्यकुमार यादव ज्यापद्धतीने फलंदाजी करत आहे त्यामुळे सर्व संघ त्याच्यावर अवलंबून आहे का? त्याच्यावर यामुळे कुठला दबाव येईल असे वाटते का?” यावर रोहित शर्माने मजेदार पद्धतीने त्या पत्रकाराला उत्तर दिले. रोहित म्हणाला, “सूर्यकुमार यादववर कुठल्याही दबावाचे ओझे नाही मात्र सुटकेसचे ओझे मात्र भरपूर आहे. त्याला शॉपिंगची खूप आवड आहे. त्याने ऑस्ट्रेलियामधून कुटुंब, मित्र, परिवार आणि संघातील सहकाऱ्यांसाठी खूप सारे भेटवस्तू आणि इतर खरेदी केली आहे. त्यामुळे तो खूप शॉपिंगच्या बाबतील शौकीन आहे. हे सर्व खेळाडू नवीन आहेत त्यामुळे मागे काय झाले आहे इतिहासात याचा या खेळाडूंवर कुठलाही दबाव नाही.” असे त्याने उत्तर दिले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा :   IND vs ENG T20 WC 2022: भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यादरम्यान ॲडलेडमध्ये पाऊस पडणार का? जाणून घ्या

क्रिकेटमध्ये म्हटले जाते की फलंदाजीने सामने बनवले जातात, तर गोलंदाजीने सामना जिंकला जातो. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी फलंदाजीबरोबर भारताला अचूक गोलंदाजीचीही आवश्यकता आहे. त्याचीच उणीव भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने भरून काढली आहे. त्याने याचवर्षी भारताच्या टी२० संघात पदार्पण केले.

अर्शदीपकडे पॉवरप्लेमध्ये विकेट काढण्याचे कौशल्य आहे. खेळपट्टीवर ज्याप्रकारे त्याचा चेंडू टप्पा खात पुढे जातो ते एक अद्भुत आहे. त्याला सुरूवातीच्या षटकांमध्ये खेळफट्टीची मदत मिळते आणि त्याचा तो योग्य फायदा उचलत विकेट्स काढतो.

Story img Loader