भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा काढत आहे. या फलंदाजाची बॅट गेल्या काही काळापासून खूप बोलत आहे. त्याचवेळी चाहते सूर्यकुमार यादवची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सशी करत आहेत. आता माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या खेळाडूवर मोठे वक्तव्य केले आहे. खरं तर, ते म्हणाले की “सूर्यकुमार यादव नवीन मिस्टर ३६० डिग्री बनला आहे, परंतु ज्या सामन्यात तो लवकर बाद होईल, त्या सामन्यात भारताला सन्मानजनक धावसंख्या करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सूर्यकुमार यादव हा टी२० प्रकारात प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. या फलंदाजाने २०२२च्या टी२० विश्वचषकात खूप धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सुपर-१२ सामन्यात सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. सुनील गावसकर म्हणाले की, या खेळाडूने जवळपास सर्व सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत, नवीन मिस्टर ३६० अंश आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या डावाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, “त्याने यष्टिरक्षकाच्या डाव्या बाजूने षटकार मारला जो अतिशय उत्कृष्ट अशाप्रकारचा होता, याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजाच्या अँगलचा फायदा घेत त्याने जो फटका मारला तो वाखाणण्याजोगा होता.”

हेही वाचा :   T20 World Cup: पंत की कार्तिक इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात रवी शास्त्रींच्या मते कोण खेळणार? जाणून घ्या

सूर्यकुमार लवकर बाद झाला तर भारत..

सुनील गावसकर म्हणतात की, “सूर्यकुमार यादवकडे लोफ्टेड कव्हर ड्राइव्हसह सर्व प्रकारचे फटके आहेत. सूर्यकुमारमुळेच भारत बचावात्मक धावसंख्या उभारू शकला आहे. त्याचवेळी तो म्हणाला की जर सुर्या अपयशी ठरला तर भारताला १४०-१५० धावा करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल. यासाठी केएल राहुल, रोहित शर्मा यांनी कमी चेंडूत अधिक धावा करणे आवश्यक आहे. त्याच वेळी ते रोहित शर्माच्या खराब फॉर्मवरही बोलले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc 2022 sunil gavaskars big statement on suryakumar yadav said if this player fails then team india get in trouble avw