टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाचे टेन्शन अजून वाढले आहे. खरं तर, इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान आणि स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड यांच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही शंका आहेत. हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतील तर ते उपांत्य फेरीतून बाहेर पडू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बटलरला या दोघांच्या फिटनेसबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मलान आणि वुड या दोघांच्या खेळावर शंका आहे. पण सामन्याच्या दिवशी दोघांची परिस्थिती काय आहे ते बघून संघात सामील करण्यात येईल. आम्हाला आमच्या फ़िजिओवर विश्वास आहे. खेळाडू तंदुरुस्त असावेत अशी आमची इच्छा आहे. संघातील प्रत्येक खेळाडूवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा आम्ही युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती.

“संघातील प्रत्येक खेळाडूंवर आमचा विश्वास आहे. पाकिस्तान दौऱ्यात आम्ही अधिक युवा खेळाडूंना संधी दिली होती. त्यांनी प्रदर्शनही चांगले केले. फिल सॉल्ट हा उत्तम माइंडसेटचा खेळाडू आहे, खासकरून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये. तो असा खेळाडू आहे ज्याचे लक्ष्य संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर असते,” असेही बटलर पुढे म्हणाला.

हेही वाचा :  ॲडलेडच्या मैदानापासून सुर्याच्या फॉर्मपर्यंत, जाणून घ्या रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेतील मोठ्या गोष्टी 

इंग्लंडचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात स्फोटक फलंदाज डेविड मलान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो फलंदाजी करण्यासही आला नाही. यानंतर वेगवान गोलंदाज मार्क वूड हा ऍडलेड ओव्हलमध्ये भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून बाहेर झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, शरीरात त्रास होत असल्यामुळे त्याने सराव सत्रात भाग घेतला नाही. स्पर्धेतील सर्वात खतरनाक गोलंदाज वूड हा स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि त्याने चार सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc 2022 will mark wood and david malan play against india explained by jos buttler in press conference avw