No Reserve Day For Super 8 Round : भारत आणि कॅनडा यांच्यात शनिवारी लॉडरहिल येथे होणारा टी-२० विश्वचषकातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्याचा दोन्ही संघांच्या सुपर-८ समीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण टीम इंडिया आधीच पात्र ठरली आहे तर कॅनडा आधीच बाहेर पडला आहे. आता भारतीय संघ २० जून रोजी पहिला सुपर-८ सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे होणार आहे. मात्र, आता सुपर-८ सामन्यातही पाऊसाने अडथळा आणला, तर सामन्याचा निकाल कसा लागणार? जाणून घेऊया.
सुपर-८ फेरीत राखीव दिवस असणार नाही –
वृत्तानुसार, ग्रुप-स्टेज सामन्यांप्रमाणे सुपर-८ फेरीतील सामन्यांमध्ये राखीव दिवसाची तरतूद नाही. म्हणजेच पाऊस पडल्यास कोणत्याही परिस्थितीत सामना त्याच दिवशी पूर्ण करावा लागेल. या स्थितीत सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. असे असूनही सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. सुपर-८ फेरीत प्रत्येक संघाला ३-३ सामने खेळायचे आहेत. जर पावसामुळे एक सामना रद्द झाला, तर संघांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कारण गट टप्प्याच्या तुलनेत त्यांचा एक सामना कमी असेल.
किमान १०-१० षटकं करावी लागेल फलंदाजी –
पहिल्या सेमीफायनल आणि फायनलदरम्यान पाऊस पडल्यास त्याच दिवशी सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान १० षटकं तरी फलंदाजी करावी लागेल. हे शक्य झाले नाही तर सामना राखीव दिवशी जाईल. पहिल्या सेमीफायनल आणि फायनलसाठी १९० मिनिटे आणि राखीव दिवसाची तरतूद आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नसेल. दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त २५० मिनिटे उपलब्ध असतील. विशेष म्हणजे दुसरा सेमीफायनल आणि फायनलमध्ये फक्त एका दिवसाचे अंतर असेल. दुसरा उपांत्य सामना २७ जूनला तर अंतिम सामना २९ जूनला होणार आहे.
हेही वाचा – T20 WC 2024 : टीम इंडिया चॅम्पियन होणार हे निश्चित! १७ वर्षांनंतर पुन्हा घडला ‘हा’ खास योगायोग
टीम इंडियाचे सुपर-८ फेरीचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार) :
२० जून २०२४: अफगाणिस्तान विरुद्ध भारत: केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस: रात्री ०८:०० वाजता
२२ जून २०२४: भारत विरुद्ध D2: सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिगा: रात्री ०८:०० वाजता
२४ जून २०२४: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया: रात्री ०८:०० वाजता