विश्वषचक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील अंतिम चार संघ कोणते हे निश्चित झालेलं आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान या चार संघांमधूनच यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा विजेता मिळणार आहे. पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठलीय तर चुरशीचा गट असलेल्या दुसऱ्या गटामधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल झाले आहे. अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये होईल याबद्दल आतापासूनच अंदाज व्यक्त केले जात आहे. अनेक पाश्चिमात्य देशातील चाहत्यांना २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेप्रमाणे इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड असा सामना होईल अशी अपेक्षा आहे. तर क्रिकेट वेडे भारतीय भारत पाकिस्तान सामना व्हावा अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र सध्याची कामगिरी पाहता भारत आणि न्यूझीलंड असा सामनाही अंतिम सामना म्हणून पहायला मिळू शकतो.
नक्की वाचा >> T20 World Cup: …तर इंग्लंडविरुद्ध मैदानात न उतरता भारतीय संघ थेट वर्ल्डकप फायनल खेळणार
या सर्व जर-तरच्या शक्यतांमध्ये मिस्टर ३६० म्हणून ओळख असलेल्या ए बी डेव्हिलियर्सने ट्वीटरवरुन एक शक्यता व्यक्त केली आहे. डेव्हेलियर्सने त्याच्यामते कोणी अंतिम सामना खेळावा याबद्दल भाष्य केलंय. विशेष म्हणजे हे भाष्य करण्याआधी त्याने चाहत्यांची मतं जाणून घेतली आहे. डेव्हेलियर्सने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक पोल घेतला. यामध्ये त्याने भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होऊ शकतो का याबद्दल आपल्या चाहत्यांना विचारलं.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
डेव्हिलियर्सच्या चाहत्यांपैकी सहा लाख ७९ हजार ५७३ जणांनी या पोलवर मत व्यक्त केलं. त्यापैकी तब्बल ७७.३ टक्क्यांहून अधिक वाचकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना रंगेल असं म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ २२.७ टक्के लोकांनी हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकत्र येणार नाहीत असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup Mr 360: “एकच मिस्टर ३६० असून मी…”, म्हणणाऱ्या सूर्यकुमारला डेव्हिलियर्सचा रिप्लाय; म्हणाला, “तू फारच…”
या पोलचा कालावधी संपल्यानंतर डेव्हिलियर्सने स्वत: यावर रिप्लाय करुन आपल्यालाही अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळताना पाहायला आवडेल असं म्हटलंय. पोल संपण्यास काही तास शिल्लक असतानाच डेव्हिलियर्सनेही आपल्याला हाच सामना पाहायला आवडेल असं सांगत एक मेटं केली. “खरोखरच हा भन्नाट अंतिम सामना होईल. आतापर्यंत ७० टक्के लोकांनी होय असं मत नोंदवलं आहे. मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या चाहत्यांची मतं नक्कीच वेगळी असतील याची मला खात्री आहे. दोन्ही संघांमध्ये उत्तम खेळाडू असून सर्वचजण छान कामगिरी करत आहेत. दोन आगळे-वेगळे उपांत्य सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माझं मत पण भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याच्या बाजूनेच आहे. हा सामना म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा होईल,” असं डेव्हिलियर्सने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
नक्की वाचा >> Ind vs Eng Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने, २२ वेळा आमने-सामने आले त्यापैकी…
१३ तारखेला मेलबर्नच्या मैदानावर विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.