ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषकाला सुरुवात झाली असून प्रत्येक जण आपापली मते मांडत आहे. टी२० विश्वचषकाला १६ तारखेपासूनच सुरुवात झाली असून पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. सुपर -१२ मध्ये पोहचण्यासाठी आठ संघ आपापसात लढत असून त्यापैकी दोन संघ हे कालच पोहचले आहेत. यात श्रीलंका आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. आज वेस्ट इंडीज, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड या चार संघांपैकी दोन संघ सुपर-१२ मध्ये पोहचतील.

टी२० विश्वचषक २०२२ या विश्वचषकाबद्दल क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आगामी आपापली मतं मांडली आहेत. पण या विश्वचषकासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार नसल्याचे भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले आहे. मागील टी२० विश्वचषकात पाकिस्ताने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे त्या पराभवाचा बदला टीम इंडिया यावेळी घेणार तेवढ्यातच हर्षा भोगले यांनी हे विधान केले आहे. “मला वाटत नाही आगामी विश्वचषकासाठी भारत फेव्हरेट असेल. मागील १० वर्षांत प्रथमच असे होत आहे की भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेसाठी फेव्हरेटस् मानले जात नाही.” अशा शब्दांत हर्षा यांनी भारतीय संघ या विश्वचषकासाठी कमकुवत असल्याचे म्हटले आहे.

कपिल देव यांच्यामते उपांत्य फेरीत पोहचण्याची केवळ ३० आशा

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि १९८३ चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी भारतीय संघाबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. कपिल देव यांच्या मते, भारतीय संघ यावेळच्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची केवळ ३० टक्के शक्यता आहे. कपिल देव लखनऊमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “टी२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने एक सामना जिंकला.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: माजी टी२० चॅम्पियन वेस्ट इंडिजला आजचा सामना जिंकणं अनिवार्य, जाणून घ्या समीकरण

यामागचे प्रमुख कारण म्हणजे खेळाडूंना झालेली दुखापत आणि गोलंदाजीतील उणीवा यामुळे कपिल देव आणि हर्षा भोगले यांनी भारताच्या बाजूने झुकते माप दिलेले नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ टी२० विश्वचषक २०२२ चे अंतिम फेरीतील दोन संघ असतील असे मत त्यांनी मांडले.

Story img Loader