भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ च्या तयारीसाठी चांगलाच घाम गाळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिली आयसीसी स्पर्धा खेळणारी टीम इंडिया या मेगा स्पर्धेत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी भारतीय चाहत्यांसह खेळाडूंचे कुटुंबीयही खूप उत्सुक आहेत. अशात आता युझवेंद्र चहलला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी धनश्री वर्मा मेलबर्नला पोहोचली आहे.
या अगोदर ही बऱ्याच खेळाडूंच्या पत्नी आपल्या पतींना सपोर्ट करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्या आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या पत्नीचा देखील समावेश आहे. तसेच आता धनश्री वर्माने देखील आपण ऑस्ट्रेलियात पोहचल्याचे, इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून माहिती दिली आहे.
धनश्रीने काही दिवसांपूर्वी टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडिओही शेअर केला होता. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धनश्री नाचत नसून भारताला सपोर्ट करण्यासाठी तिने बसून हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री ‘बल्ला चला, छक्का लगा… ये कप हमारा है घर लेकर आ…’ गाताना दिसत आहे.
काही काळापूर्वी धनश्रीला डान्स करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रियाही झाली होती. मेलबर्नला पोहोचल्यानंतर धनश्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुडघ्यावर कॅप घातल्याचे दिसत आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, भारताची लढत नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशशी होणार आहे.
टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.