टी२० विश्वचषकात सुपर १२ चा टप्पा सुरू झाला आहे. सुपर १२ च्या दुसऱ्या सामन्यात, एकदिवसीय विश्वचषक विजेता संघ इंग्लंडचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध सुरु असून पर्थच्या मैदानावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ११२ धावांत गुंडाळला.

इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणातील कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केले. अप्रतिम झेल आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला ११२ धावांवर रोखण्यात यश आले. गोलंदाजांची प्रशंसा तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाला देखील तितकेच क्रेडीट दिले पाहिजे. यामध्ये काही उत्कृष्ट झेल होते, जे विशेषत: आदिल राशिद, जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी टिपलेले तीन झेल.

आदिल राशिदने नजिबुल्लाह चा, जोस बटलर ने कर्णधार मोहम्मद नबीचा तर ख्रिस वोक्स ने मुजीब चा अप्रतिम झेल पकडत सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले.  

इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर अफगाणी फलंदाजांनी संथ सुरूवात केली. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी किंवा भागीदारी रचण्यात यश आले नाही. अखेर अफगाणिस्तानचा डाव १९.४ षटकात ११२ धावांवर संपुष्टात आला.अफगाणिस्तानकडून इब्राहीन झादरान आणि उस्मान घानी यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र झादरान ३२ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. तर उस्मान गाझीने ३० चेंडूत ३० धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने १० धावात अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी धाडला. तर मार्क वूड आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Story img Loader