टी२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतावर १० विकेट्सने मात केली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात ६ बाद १६८ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य दिले. विजयाचे लक्ष्य इंग्लंड संघाने १० विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले आणि अंतिम फेरीत धडक मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडसाठी संघाचे सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी १७० धावांची नाबाद भागीदारी करत भारताचा १० विकेट्सने पराभव केला. आता टी२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानसोबत खेळवला जाईल. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघाने प्रत्येकी एकदा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले असून आता त्यांना दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. इंग्लंडच्या संघानेही तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

विराट कोहलीच्या संथ खेळीवर वसीम अक्रम यांची टीका

सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने पाकिस्तानी चॅनल ए स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध खूप संथ सुरुवात केली आहे. कदाचित या खेळपट्टीवर १९० ही चांगली धावसंख्या ठरली असती. टीम इंडियाच्या फलंदाजांनी प्रदीर्घ काळानंतर आक्रमण करायला सुरुवात केली.

वसीम पुढे म्हणाला की, “जर हार्दिक पांड्या टीम इंडियात नसता तर १६८ धावांची सन्मानजनक धावसंख्याही बनवता आली नसती. वसीमने विराट कोहलीवरही टीका करताना म्हटले की, विराट कोहलीने सामन्यात अर्धशतक केले असेल पण ४० चेंडू घेतल्याने त्याची खेळी खूपच संथ होती.”

रोहित शर्माच्या फलंदाजीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, “तो म्हणाला की टीम इंडियाचा कर्णधार रोहित मला आउट ऑफ टच वाटत होता. संपूर्ण विश्वचषकात त्याने एकही मोठी खेळी केली नाही. त्याच्या एकाही शॉटमध्ये मला आत्मविश्वास जाणवला नाही. भारतीय संघांचा दृष्टीकोनच हा नेहमी शेवटच्या षटकात मोठे फटके मारून धावगती वाढवणे हा दिसला. पॉवर प्ले मध्ये केएल राहुल, रोहित आणि विराट यातिघांनीही नेहमी आधी विकेट्स वाचवण्याच्या विचारातून फलंदाजी केली. आधी १० षटकात स्थैर्य मिळवून द्यायचे आणि नंतर येणारे फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या हे येऊन मोठे फटके मारतील अशी टीम इंडियाचे प्लानिंग होते असे मला यातून दिसत होते आणि हे खूपच चुकीचे होते असे माझे मत आहे.”

भारतीय संघांच्या गोलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न

टीम इंडियाच्या गोलंदाजीवर बोलताना अक्रम म्हणाला की, “ एकही गोलंदाजाने वेगळा प्रयत्न केला नाही. सर्वांचे खांदे झुकलेले वाटत होते. युजवेंद्र चहलला संघात न घेणे हा निर्णय मला समजण्यापलीकडचा होता. भारतीय गोलंदाजाकडे वेग दिसत नव्हता. याला कारण काय आहे हे भारतीय संघव्यवस्थापनाने बसून विचार करायला हवा.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 former pakistan legend wasim akram criticizes virat kohlis slow batting avw
Show comments