टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात झाली. गतविजेता ऑस्ट्रेलियाने २०२१च्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले होते त्याचा वचपा आजच्या सामन्यात तब्बल ८९ धावांनी पराभव करत न्यूझीलंडने काढला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले होते. महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

टी२० विश्वचषकाचे प्रमुख दावेदार आणि माजी विजेते म्हणून ज्यांच्याकडे पहिले जात होते त्यांना त्यांच्याच शेजारी असणाऱ्या देशाने म्हणजेच न्यूझीलंडने तब्बल ८९ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. सलामीवीर फिन ऍलनने १६ चेंडूंवर ४२ धावांची खेळी केली. केन विलियम्सन व ग्लेन फिलिप्स हे देखील उपयुक्त योगदान देत माघारी परतले. अखेरीस अष्टपैलू जिमी निशामने १३ चेंडूत २६ धावा चोपल्या. मात्र, सलामीवीर कॉनवेने ५८ चेंडूंवर ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड २० षटकात ३ बाद २०० धावा बनवण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियासाठी जोस हेजलवूडने दोन बळी आपल्या नावे केले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सिडनीवरील खेळपट्टीचा चांगला वापर करत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले. टीम साऊदीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा अवघ्या ५ धावेवर त्रिफळा उडवला. त्यानंतर सँटनरने कर्णधार फिंचला १३ तर टीम साऊदीने शॉन मार्शला १६ धावांवर बाद करत कांगारूंची फलंदाजांची वरची फळी तंबूत धाडली.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘मी वर्ल्ड कप… फ्लाइट’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माहीचे मजेशीर उत्तर, पाहा video

अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड टीम डेव्हिड हे देखील संघासाठी फारसा योगदान देऊ शकले नाहीत. बराच वेळ अडखळत खेळत असलेला ग्लेन मॅक्सवेल २८ धावांवर बाद झाला. ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचे अखेरचे फलंदाज झटपट गुंडाळत ऑस्ट्रेलियाचा डाव १११ धावांवर संपवला. न्यूझीलंडसाठी मिचेल सॅंटनर व‌ टीम साऊदी यांनी प्रत्येकी दोन तर ट्रेंट बोल्टने दोन बळी मिळवले.

Story img Loader