टीम इंडिया आपला‌ दुसरा टी२० विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती मात्र यावेळीही पदरी निराशा आल्याने सध्या चोहीकडून संघावर टीकेचा भडीमार सुरु आहे. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. त्याचवेळी विश्वचषकासाठीच्या संघात समाविष्ट असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही.‌ त्यामुळे अनेकांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे.

टीम इंडियाने विश्वचषकात सहा सामने खेळले. या सहाही सामन्यात युजवेंद्र चहलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघातील तो एकमेव असा खेळाडू राहिला ज्याला एकाही सामन्यात खेळण्यासाठी निवडले गेले नाही. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांचा लाभ त्याला होईल अशी अपेक्षा ठेवून त्याची निवड केली गेलेली. मात्र, स्पर्धेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाने व कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन अक्षर पटेल यांच्यावर विश्वास दाखवला.

Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ranji Trophy 2025 Virat kohli eats Chilli Paneer in lunch during Delhi vs Railways match at Arun Jaitley Stadium Canteen vbm 97
Ranji Trophy 2025 : विराटने लंचब्रेकमध्ये छोले-भटूरे नव्हे तर ‘या’ पदार्थावर मारला ताव, कोणता होता तो? जाणून घ्या
Ranji Trophy 2025 Shubman Gill scored a century against Karnataka but Punjab lost the match by an innings and 207 runs
Ranji Trophy 2025 : शुबमन गिलची शतकी खेळी व्यर्थ! कर्नाटकाचा पंजाबवर मोठा विजय
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ
Ranji Trophy 2025 Rohit Sharma suffers twin failure on Ranji return gets out for 28 in 2nd innings Mum vs JK match
Ranji Trophy 2025 : रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी, हिटमॅनचा झेलबाद झाल्याचा VIDEO व्हायरल
England Announced Playing XI Against India For IND vs ENG 1st T20I Match on Eden Gardens Kolkata
IND vs ENG: इंग्लंडने भारताविरूद्ध पहिल्या टी-२०साठी जाहीर केली प्लेईंग इलेव्हन, संघाला मिळाला नवा उपकर्णधार
U-19 Women's T20 World Cup 2025 Nigeria Defeats New Zealand By Just Runs big Upset in Cricket History
NZW vs NGAW U19 WC: U19 टी-२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ, नायजेरियाने न्यूझीलंडला दिला पराभवाचा दणका

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण…’कपिल देव यांचे संघातील बदलांवर मोठे विधान

येत्या २०२२ या संपूर्ण वर्षभरात युजवेंद्र चहल हा भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू होता. त्याने या वर्षी भारतीय संघासाठी खेळताना १४ बळी मिळवलेले. तसेच यावर्षीच्या आयपीएलमध्ये देखील त्याने सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप आपल्या नावे केलेली. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात देखील तोच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या संथ खेळीवर केली टीका

विश्वचषक स्पर्धेसाठी समालोचन करणारे भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, इरफान पठाण, आकाश चोप्रा व रवी शास्त्री हे सातत्याने चहलला संघात स्थान देण्याविषयी बोलताना दिसले. हरभजन याने म्हटले होते की, “सध्या फलंदाजी विभागात ज्याप्रकारे कोहलीचा दर्जा आहे त्याप्रकारे फिरकी गोलंदाजीत चहलचा दर्जा दिसतो.” तर, चोप्रा व शास्त्री यांनी “भारताने ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानाचा फायदा घेण्यासाठी चहलला संधी द्यावी असे म्हटलेले.” उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर इरफानने ‘युजवेंद्र चहल’ असे ट्विट करत आपली निराशा व्यक्त केलेली. ‌तर काही चाहत्यांनी चहलला केवळ ऑस्ट्रेलिया फिरायला घेऊन गेले होते का असे म्हटले.

Story img Loader