टी२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. त्यांनी सोमवारी बिस्बेन येथील गाबा येथे सहा गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे हा सामना १९-१९ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १४.४ षटकांत ४ गडी गमावत १६३ धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोन षटके टाकली. या काळात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. आफ्रिदीने दुखापतीतून पुनरागमन केले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर हॅरी ब्रुकने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याने २४ चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. सॅम करन १४ चेंडूत ३३ धावा करून नाबाद राहिला. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने दोन गडी बाद केले. शादाब खान आणि नसीम शाह यांना प्रत्येकी एक यश मिळाले. शाहीनने दोन षटकांत केवळ सात धावा दिल्या. तो सर्वात किफायतशीर होता, परंतु यशस्वी झाला नाही.

इंग्लंडच्या संघाला तीन धावांवर पहिला धक्का बसला. फिलिप सॉल्ट एक धाव काढून बाद झाला. त्याला नसीम शाहने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर बेन स्टोक्सला मोहम्मद वसीम ज्युनियरने बाद केले. स्टोक्सने झंझावाती खेळी करत १८ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. अॅलेक्स हेल्स नऊ धावा करून शादाब खानचा बळी ठरला. मोहम्मद वसीम ज्युनियरला लियाम लिव्हिंगस्टोन, शादाब खानने झेलबाद केले. त्याने १६ चेंडूत २८ धावा केल्या.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘मारने का मूड ही नही…’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्या बाद, आवाज स्टंपच्या माईकमध्ये कैद, पाहा VIDEO

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. या सामन्यात शान मसूद आणि हैदर अली सलामीसाठी आले होते. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हा सामना खेळत नाहीत. शादाब खान संघाचे नेतृत्व करत आहे. हैदर आणि शान यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. शान २२ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्याचवेळी हैदर १८ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार शादाब १४ धावा, इफ्तिखार अहमद २२ धावा आणि खुशदिल शाह खाते न उघडता तंबूत परतले. यानंतर आसिफ अली, मोहम्मद नवाज यांनाही काही विशेष करता आले नाही.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: रोहितला चक्क ११ वर्षाच्या मुलाने केली गोलंदाजी, कोण आहे तो मुलगा जाणून घ्या

आसिफ १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला तर नवाजने ११ चेंडूत १० धावा केल्या. मोहम्मद वसीम ज्युनियरने पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो १६ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. अखेरीस नसीम शाह दोन धावांवर नाबाद राहिला आणि हारिस रौफने एक धाव केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने दोन बळी घेतले. त्याचवेळी बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.