टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियन भूमीवर पार पडत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. त्यात काही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियन संघाचाही समावेश आहे, जो आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यास उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला दुबईत न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांदाच टी२० विश्वचषक जिंकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच, आकडेवारीनुसार, अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणे अवघड आहे. कारण आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही यजमान संघाला टी२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्याचबरोबर गतविजेता संघ देखील कधीही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. म्हणजेच आतापर्यंत कोणत्याही संघाने सलग दोन विजेतेपदे जिंकलेली नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला, तर दोन विक्रम आपल्या नावावर करेल.

पाहा आकडेवारी काय सांगते –

२००७ – विश्वचषकाचा पहिला मोसम दक्षिण आफ्रिकेत झाला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. यजमान दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे तर ते सुपर-एटच्या पलीकडे प्रगती करू शकले नाही.

२००९- टी२० विश्वचषक २००९ इंग्लिश भूमीवर आयोजित करण्यात आला होता. गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानने या मोसमात विजेतेपद पटकावले होते. त्यांनी अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. २००७ चा चॅम्पियन संघ भारत आणि यजमान इंग्लंडला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही.

२०१० – वेस्ट इंडिजने २०१० टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले. मात्र, यजमानांची कामगिरी निराशाजनक राहिली आणि त्यांना उपांत्य फेरीतही आपले स्थान निश्चित करता आले नाही. २०१० च्या मोसमाचे विजेतेपद इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकले होते. २००९ च्या चॅम्पियन पाकिस्तानला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा : AFG vs PAK: शाहीन आफ्रिदीच्या खतरनाक यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला पाठवले रुग्णालयात, पाहा व्हिडिओ

२०१२ – टी२० विश्वचषक २०१२ ची स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी वेस्ट इंडिजने विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान श्रीलंकेचा पराभव केला. त्याचबरोबर २०१० चा चॅम्पियन संघ इंग्लंड सुपर-८ टप्प्यातूनच बाहेर पडला होता.

२०१४ – बांगलादेशने आयोजित केलेल्या २०१४ च्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद श्रीलंकेने पटकावले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला. तसेच यजमान बांगलादेशला सुपर-१० टप्प्यातूनच बाहेर पडावे लागले. त्याचवेळी २०१२ च्या चॅम्पियन विंडीजला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१६ – भारताने प्रथमच टी२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले. मात्र, यजमानांची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती आणि उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. २०१४ चा चॅम्पियन संघ श्रीलंकेला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही.

२०२१- यूएई आणि ओमान यांनी संयुक्तपणे २०२१ च्या टी२० विश्वचषकाचे आयोजन केले. यूएईला विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही, तर ओमानला पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले. २०१६ चा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज सुपर-१२ च्या टप्प्यातूनच बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदाचा सामना झाला, ज्यामध्ये कांगारू संघ विजेता ठरला.

आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी १-१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी कोणता संघ चॅम्पियन होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.