टीम इंडियाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या त्यांच्या पहिल्या अधिकृत सराव सामन्यात गतविजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. या विजयात चार खेळाडूंचा मोठा हात होता. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी गोलंदाजीतील त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला. या सामन्यात शमीला २० व्या षटकात सरळ गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि टीम इंडियाला ११ धावांवर बचाव करावा लागला, तर ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट शिल्लक होत्या. केएल राहुलने प्रथम ३३ चेंडूत ५७ धावा केल्या, त्यानंतर सूर्यानेही तेवढ्याच चेंडूत ५० धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या डावादरम्यान त्याने अनेक पॅडल आणि स्वीप शॉट मारले. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकारासह शानदार अर्धशतक साजरे केले. यावेळी त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर सूर्यकुमारने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या अक्षर पटेल याला म्हटले की, तो चेंडू मारण्याच्या मूडमध्ये नाहीये. त्याचा हा आवाज स्पष्टरीत्या ऐकू येत होता.

सूर्या बाद होण्याआधीच त्याच्या तोंडून निघणारी कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादव शेवटच्या षटकात अडखळत खेळताना दिसला. त्यामुळे तो थोडा नाराजही होता. दरम्यान, ‘मारने का मूड ही नहीं हो रहा है यार।’, असे सूर्यकुमार यादवचे शब्द हे त्या स्टंप माईकमध्ये ऐकू आले. हे लक्षात घेण्यासारखे होते की त्यानंतर लगेचच तो स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चुकीचा फ्लिक शॉट खेळताना पुढच्या चेंडूवर बाद झाला. झेल थेट वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनच्या हाती लागला. झेल थेट वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनच्या हाती लागला.

हेही वाचा : T20 World Cup 2022: रोहितला चक्क ११ वर्षाच्या मुलाने केली गोलंदाजी, कोण आहे तो मुलगा जाणून घ्या

सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि टीम इंडिया टी२० विश्वचषक २०२२ मध्ये त्याच्या फलंदाजीवर खूप अवलंबून आहे. सध्या सूर्यकुमार यादव हा टी२० क्रिकेटमध्ये जगातील नंबर-२ फलंदाज आहे. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ७ गडी गमावून १८६ धावा केल्या.