टी२० विश्वचषकाचा सराव सामना सोमवारी ब्रिस्बेनमधील गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी हा सराव सामना महत्त्वाचा आहे कारण दोन्ही संघ आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग ११ शोधण्याचा प्रयत्न करतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकतेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले, पहिला सामना जिंकला आणि दुसरा हरला. दुसरीकडे, अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला नुकतेच तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला.

भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे शेवटच्या षटकांची गोलंदाजी, जी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांना सुधारायची आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने शेवटच्या पाच षटकांत ४१ धावा देत सुधारणा दाखवली. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात प्रभावी गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विनने सराव सामन्यांमध्ये तीन बळी घेत चांगली कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी परतणार आहेत.

हेही वाचा :   जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : रुद्रांक्ष, अर्जुन, किरणला सुवर्णपदक

दोन सराव सामन्यांत भारतीय संघाला गोलंदाजी आणि मधल्या फळीतील फलंदाजीच्या प्रश्नांची ठोस उत्तरे शोधायची आहेत. यजमान ऑस्ट्रेलियन संघासमोर आज सराव सामना होत आहे, ज्यात दोनही संघ जिंकण्या व हरण्यापेक्षा संघ बांधणीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. केन रिचर्डसन, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांना इंग्लंडविरुद्ध फारसा फायदा झाला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच्या खेळावर सस्पेन्स कायम होता. ऑस्ट्रेलियन फलंदाज सुस्थितीत असून अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी ही त्याची चिंता आहे. ग्लेन मॅक्सवेलला भारताविरुद्धच्या सराव सामन्यात चमकदार कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करायची आहे.

हेही वाचा :  एमचेस जलद बुद्धिबळ स्पर्धा : एरिगेसीकडून कार्लसन पराभूत 

दोन्ही संघ

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

Story img Loader