टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंडस संघात सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी भारताने जर दक्षिण आफ्रिका संघावर विजय मिळला, तर भारतीय संघ आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करेल. परंतु पाकिस्तान संघाला तिन्ही सामने जिंकून बाकीच्या संघाचे निकाल आणि नेट रन रेटवर अवलंबून रहावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील १० वर्षापीर्वी देखील पाकिस्तान संघासोबत असाच एक किस्सा घडला होता. त्यावेळी देखील या संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागले होते. तो सामना सुद्धा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातच झाला होता. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पराभूत करुन, नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी मदत केली होती.

आज १० वर्षांनी पुन्हा तिच परिस्थिती ओढावली आहे. फक्त थोडा बदल झाला आहे. आजच्या सामन्यात जर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या अशा जिवंत राहतील. त्यामुळे पाकिस्तानचे एकंदरीत भवितव्य भारताच्या हाती आहे. त्याचबरोबर भारताला सुद्धा दक्षिण आफ्रिकेसोबतचा मागील बदला घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आजचे सामने पाहणे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – IND vs SA T20 World Cup 2022: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस घालणार का गोंधळ, जाणून घ्या

आज पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स संघात दिवसातील दुसरा सामना १२:३० ला सुरु होणार आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामना ४:३० ला सुरु होणार आहे. दोन्ही सामने पर्थ येथील मैदानावर खेळले जाणार आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 india will take revenge on south africa 10 years ago and pakistans pulse will increase vbm