भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुपारी हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी गोलंदाज यांच्यात रंजक सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात सर्वात मोठी लढत सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद रिझवान यांच्यात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे दोन्ही फलंदाज सध्याच्या आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल दोन फलंदाज आहेत. दोघांमध्ये फक्त काही गुणांचा फरक आहे. अशा स्थितीत जर सूर्यकुमारला रिझवानपेक्षा जास्त धावा आणि चांगली फलंदाजी करता आली, तर तो पाकिस्तानी फलंदाजांना मागे टाकून टी-२० मधील नंबर वन फलंदाज बनेल.

सूर्यकुमार आणि रिझवानची आकडेवारी –

रिझवानचे सध्या ८६१ गुण आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमारचे ८३८ गुण आहेत. दोघांमध्ये २३ गुणांचे अंतर आहे. दोन्ही फलंदाजांनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. रिझवानने यावर्षी आतापर्यंत १८ सामन्यांच्या १८ डावांमध्ये १२६.३० च्या स्ट्राईक रेटने ८२१ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद ८८ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच वेळी, सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये २३ सामन्यांच्या २३ डावांमध्ये १८४.५६च्या स्ट्राइक रेटने ८०१ धावा केल्या आहेत. ११७ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत-पाक सामन्यापूर्वी विराट कोहलीचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘या’ क्षणासाठी….!

तसेच टीम इंडियाच्या फलंदाजीच्या फळीत रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज आहेत. त्याचवेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीची फळी शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांसारख्या गोलंदाजांनी सजली आहे. त्यामुळे स्पर्धा रंजक होणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 indivs pak match will decide number one t20 batter rizwan vs suryakumar yadav vbm
Show comments