टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये रविवारी कोरानाचे पहिले प्रकरण समोर आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉकरेल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. कोराना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डॉकरेलने सामन्यात खेळला आणि त्याने १६ चेंडूत १४ धावा केल्या. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने डॉकरेलला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली होती.

अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉकरेलला आयसीसीच्या नवीन कोरोना गाईडलाइन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या गाइडलाइन्सनुसार, खेळण्याची संधी देण्यात आली होती. कारण आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला मॅच खेळण्यापासून आणि सराव करण्यापासून रोखले जाणार नाही. तथापि, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला सामना आणि सरावाच्या दिवशी सहकारी खेळाडूंपासून वेगळा प्रवास करावा लागतो.

टी-२० वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटने डॉकरेलबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉकरेलमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली आहेत. आयर्लंडच्या वैद्यकीय पथकाने रविवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि आयसीसीच्या सूचनेनुसार लोकांशी त्यांच्या भेटी नियंत्रित केल्या. आयसीसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, विरोधी संघ आणि स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत-पाक सामन्यात ठरणार नंबर वन टी-२० फलंदाज, कोण मारणार बाजी सूर्यकुमार की रिझवान?

डॉकरेलने स्कॉटलंडविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात २७ चेंडूत ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. हा सामना ६ गडी राखून जिंकून आयर्लंडचा संघ सुपर-१२ मध्ये पोहोचला. सुपर-१२ फेरीत आयर्लंडचा दुसरा सामना 28 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Story img Loader