ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे शुक्रवारी(२८ ऑक्टोबर) मुसळधार पावसामुळे दोन सामने रद्द करावे लागले. अफगाणिस्तान आणि आयर्लंडचा पहिला सामना रद्द झाला होता, त्यानंतर दुसरा सामना, यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सामनाही मेलबर्नमध्ये संततधार पावसामुळे रद्द करावा लागला. यासोबतच पावसाचा कहर भविष्यातही काही सामन्यांमध्ये पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण आता केवळ खेळपट्टीऐवजी संपूर्ण मैदान झाकले असते, तर रद्द झालेले दोन्ही सामने होण्याची शक्यता होती का? अशी चर्चा आता जागतिक क्रिकेट विश्वात सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट लॉ यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लॉ यांना वाटते की, मेलबर्नमध्ये संपूर्ण मैदान झाकूनही फारसा फरक पडत नाही. कारण तेथे पाणी बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट लॉ यांनी क्रिकट्रॅकरवरील रन स्ट्रॅटेजी शोमध्ये एक मोठे विधान केले, की मेलबर्नमध्ये पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे असलेली ड्रेनेज व्यवस्था भूमिगत आहे. म्हणजे पावसाचे पाणी जमिनीखालील ड्रेनेज सिस्टिममधून बाहेर पडते.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : ‘मांकडिंग’ रनआउट मुद्द्यावर ब्रॅड हॉगने मांडले अचूक मत, पाहा काय म्हणाला

मेलबर्नमध्ये पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळीच वाढते. त्यामुळे पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळे जरी संपूर्ण मैदान झाकले तरी ओलावा आपोआप वर येईल. अशी पद्धत श्रीलंकेत काम करू शकते. कारण तेथे वेगळी ड्रेनेज व्यवस्था आहे. पण त्यामुळे फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही, कारण ऑस्ट्रेलियात सर्व पाणी जमिनीखाली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 it wouldntve made much of a difference stuart law dismisses idea of covering entire ground of mcg vbm