PAK vs NZ Semi-Final Highlights : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. हा सामना सिडनी येथे पार पडत आहे. या सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी १५३ धावा करायच्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. फिन अॅलनच्या (४) रुपाने पहिल्या षटकात झटका बसला आहे. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पायचित केले. त्यानंतर न्यूझीलंड संघाने सावध भूमिका घेताना पावरप्लेच्या समाप्ती नंतर न्यूझीलंड २ बाद ३८ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन ४२ चेंडूत ४६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार लगावला.
न्यूझीलंड संघाचा डाव सावरताना डॅरिल मिशेल सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह अफ्रिदीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आता पाकिस्तान संघाला विजयासाठी १५३ धावा करायच्या आहेत.
Pakistan vs New Zealand 1st Semi-Final Highlights : पाकिस्तान वि न्यूझीलंड लाइव्ह अपडेट्स
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.
१३२ धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. मोहम्मद रिझवान ४३ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या शानदार फलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला आहे. सध्या मोहम्मद रिझवान आणि हारिस रौफ क्रीजवर आहेत. पाकिस्तान संघाला विजयासाठी १९ चेंडूत २१ धावांची गरज आहे.
बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. दोन्ही स्टार फलंदाज संघाच्या लयीत आले आहेत. हे दोघेही या विश्वचषकात खराब फॉर्मशी झुंज देत होते, परंतु अंतिम सामन्यापूर्वी ते प्रकाश झोतात आले आहेत. रिझवानने आतापर्यंत ३६ चेंडूत ५० धावा केल्या असून पाच चौकार लगावले आहेत.
१०५ धावांवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. बाबर आझम ५३ धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डॅरेल मिचेलने त्याचा झेल घेतला. मात्र, बाद होण्यापूर्वी बाबरने शानदार खेळी करत आपले काम चोख बजावले. पाकिस्तान संघ अजूनही मजबूत स्थितीत आहे. १३ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर १०९ आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अप्रतिम खेळी करत या विश्वचषकातील पहिले अर्धशतक पूर्ण केले आहे. बाबरने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि फॉर्ममध्ये परतला. बाबर आझम संपूर्ण विश्वचषकात धावांसाठी तळमळत होता, पण आता जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा तो पूर्ण फॉर्ममध्ये आला आहे.
पाकिस्तान - १०० -० (११.३)
बाबर आझम - ५१ (३९)
मोहम्मद रिझवान - ४५ (३१)
१० षटकांच्या समाप्तीनंतर पाकिस्तानची धावसंख्या ८७ धावा केल्या आहेत. आता विजयासाठी ६६ धावांची आवश्यकता आहे. बाबक-रिझवान दोघेही नाबाद आहेत.
पाकिस्तान - ८१-० (९.५)
बाबर आझम - ४३ (३५)
मोहम्मद रिझवान - ४१ (२७)
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि त्यांनी पाकिस्तान संघाला मजबूत स्थितीत नेले आहे. या विश्वचषकात पहिल्यांदाच या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. आठ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ६८ धावा आहेत.
पाकिस्तान - ८१-० (९.५)
बाबर आझम - ४१ (३३)
मोहम्मद रिझवान - ४१ (२६)
पाकिस्तानच्या धावसंख्येने कोणतेही नुकसान न करता ५० धावांचा आकडा ओलांडला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान शानदार फलंदाजी करत आहेत. विशेषत: रिझवान तुफानी पद्धतीने धावा काढत आहे. सहा षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ५५ धावा आहे. रिझवान २८ आणि बाबर २५ धावांवर खेळत आहे.
पाकिस्तान - ६२-० (६.५)
बाबर आझम - ३० (२२)
मोहम्मद रिझवान - ३० (१९)
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट लयीत नाही. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात १५ धावा दिल्या आणि पाकिस्तान संघाने वेग पकडला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे ब-याच काळानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. दोघेही चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत आहेत. बाबर १४ आणि रिझवान १८ धावांवर खेळत आहे. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ३२ धावा आहे.
पाकिस्तान ४९-० (५.३)
बाबर आझम - २० (१६)
मोहम्मद रिझवान - २७ (१७)
टीम साऊदीने दुसऱ्या षटकात दमदार गोलंदाजी केली आणि फक्त दोन धावा दिल्या. दोन षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद नऊ अशी आहे. किवी गोलंदाजांनी संयमी गोलंदाजी करून दडपण निर्माण केले तर विकेट पडण्याची शक्यता आहे. सध्या बाबर दोन आणि रिझवान सात धावांवर खेळत आहे.
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची सलामी दिली. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत आहे. मोहम्मद रिझवानने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, पहिल्याच चेंडूवर बाबर आझमचा झेल सोडत न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाने बाबर आझमला मोठे जीवनदान दिले आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद सात धावा आहे.
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान संघासमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिशेल सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन शाह अफ्रिदीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
१८ व्या षटकांत नसीम गोलंदाजी करायला आला होता. त्याला या षटकात मिचेलने चौकार मारला. या षटकात एकूण १० धावा झाल्या.
१७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. कर्णधार केन विल्यमसन ४२ चेंडूत ४६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार लगावला. विल्यमसन बाद झाल्यानंतर जेम्स नीशम क्रीझवर आला आहे.
१५ व्या षटकाच्या समाप्ती नंतर न्यूझीलंड संघाने ३ गडी गमावून १०६ धावा केल्या आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकीय भागीदारी केली आहे.
न्यूझीलंड १०६ -३ (१५)
केन विल्यमसन - ४६ (४१)
डॅरिल मिशेल - ३३ (२१)
वेगवान गोलंदाज नसीम शाह १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. या षटकातील पहिल्या २ चेंडूत २ धावा आल्या. या षटकात ८ धावा झाल्या. १२ षटकांनंतर न्यूझीलंडने 3 गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंड ८१ -३ (१२)
केन विल्यमसन - ३५ (३२)
डॅरिल मिशेल - २१ (२०)
११व्या षटकात फिरकी गोलंदाज शादाब खान गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिशेलन चौकार लगावला. या चेंडूवर चार धावा झाल्या. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन दुहेरी धावा आल्या. मिशेलने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. या षटकात १४ धावा झाल्या.
न्यूझीलंड - ७३-३ (११)
न्यूझीलंडच्या डावातील १० षटके संपली आहेत. त्यांनी ३ गडी बाद ५९ धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन २४ चेंडूत २३ तर डॅरेल मिशेल ८ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे. उत्तम भागीदारी उभारण्याची जबाबदारी दोघांवर आहे.
न्यूझीलंड ५९-३ (१०)
केन विल्यमसन - २३ (२४)
डॅरिल मिशेल - ६ (८)
मोहम्मद नवाजने न्यूझीलंड संघाला तिसरा धक्का दिला आहे. त्याने ग्लेन फिलिप्सला (६) धावांवर बाद केले. त्यामुळे न्यूझीलंड संघाची धावसंख्या ८.१षटकात ३ बाद ४९ अशी झाली आहे.
न्यूझीलंड ५२-३ (९)
केन विल्यमसन - २० (२१)
हारिस रौफच्या पहिल्याच चेंडूवर कॉनवेने ऑफ साइडच्या दिशेने चौकार मारला. चौथ्या चेंडूवर कॉनवेने २ धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर शादाब खानने नॉन स्ट्राइकच्या दिशेने शानदार थ्रो मारल्यानंतर डेव्हॉन कानवे २० चेंडूत २१धावा काढून बाद झाला. पॉवरप्ले संपल्यानंतर न्यूझीलंडने २ गडी गमावून ३८ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंड १९-१ (३)
केन विल्यमसन - ५ (४)
डेव्हॉन कॉनवे - १० (११)
न्यूझीलंड संघाला पहिल्याच फिन अॅलनच्या (४) रुपाने पहिल्या षटकात झटका बसला आहे. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पायचित केले.
न्यूझीलंड ६-१ (१)
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर सज्ज झाले आहेत. पहिल्यांदा पाकिस्तान संघाचे राष्ट्रगीत संपन्न झाले, त्यानंतर न्यूझीलंड संघाचे झाले.
शॉन पोलॉकने सांगितले की, ही तीच खेळपट्टी आहे. जी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी वापरली गेली होती. या खेळपट्टीवर दोन प्रकारचा वेग पाहायला मिळतो. पाकिस्तानने या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल. पाकिस्तानच्या गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळू शकतो. ज्यामुळे न्यूझीलंडसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या टी-२० विश्वचषकात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सिडनीमध्ये आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. अशा स्थितीत नाणेफेकने न्यूझीलंडला साथ दिली आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याच्या नाणेफेकीसाठी बाबर आझम आणि केन विल्यमसन मैदानावर दाखल.
आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिल्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी तिथून सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर ज्या षटकात खेळ थांबेल, त्याच षटकातपासून दुसऱ्या दिवशी सुरू होईल. जर एखाद्या संघाने पहिल्या ११ षटकांत २ गडी गमावून ८० धावा केल्या आणि पावसामुळे त्या दिवशी सामना होऊ शकला नाही, तर तोच संघ दुसऱ्या दिवशी त्याच धावसंख्येसह खेळण्यास सुरुवात करेल. दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण झाला नाही, तर सुपर-१२ मधील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
T20 World Cup 2022 Highlights, PAK vs NZ Semi-Final : पाकिस्तान वि न्यूझीलंड लाइव्ह अपडेट्स