कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (२३ ऑक्टोबर) होणार आहे. त्या अगोदर या सामन्या संदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील आयसीसी टी२० विश्वचषक सामन्यासाठी जाहिरातीचे दर वाढले आहेत. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे दोन मंडळांमधील शाब्दिक युद्ध. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील आशिया चषक २०२३ च्या आयोजनावरून जाहिरातींच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याने ऐन सणासुदीच्या काळात याची झळ चाहत्यांना सोसावी लागणार आहे. भव्य मंचावर आशियाई जाहिरातींच्या दरांमध्ये वाढ झाली आहे याचे परिणाम संपूर्ण भारतासह इतर देशांमध्ये देखील जाणवणार आहेत.

सामन्याच्या खूप आधीपासून, ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय सामन्यांच्या प्रतिकूल वेळेमुळे प्रसारकांना स्पर्धेच्या कमाईबद्दल शंका होती. बहुतेक सामने दुपारी होत असल्याने, नफा कसा होईल, असे प्रश्न प्रसारकांकडून उपस्थित केले जात होते. यातच भर पडली ती आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला न जाण्याबद्दल बीसीसीआयने घेतली तटस्थ भूमिका आणि त्यांच्यातील शाब्दिक देवाणघेवाण ही ठरली आहे. दुसऱ्याबाजूने पीसीबीने देखील त्याच्या बाजूने वादग्रस्त विधाने केली. यामुळे इव्हेंट अधिक जिवंत झाला आहे. आता या शाब्दिक युद्धानंतर रविवारी आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हाय व्होल्टेज लढतीत काय होते, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टी२० विश्वचषक सामन्यापूर्वी जाहिरातीचे दर वाढले –

भारत-पाकिस्तान सारख्या खेळातील लढती खासकरून क्रिकेटमधल्या या जगभरात नेहमीच मोठ्या प्रमाणावर फॉलो केल्या जातात. यामुळे जाहिरातदारांना याचा खूप मोठा फायदा होतो. अनेकांना प्रसिद्ध ‘मौका-मौका’ जाहिरात आठवत असेलचं, ज्यामध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने आपल्या आयुष्यातील २० वर्षे या आशेने घालवली की, त्याचा राष्ट्रीय संघ आपली पराजयाची मालिका संपवेल आणि टीम इंडियावर विजय मिळवेल. ही जाहिरातीची कल्पना जबरदस्त हिट ठरली आणि त्यामुळे ती जाहिरातही खूप गाजली. भारत – पाकिस्तान फक्त आयसीसी आणि आशिया चषकात एकमेकांबरोबर खेळत असल्याने यात दोघांना याचा मोठा आर्थिक फायदा होतो. हा आर्थिक फायदा होण्यागागे प्रेक्षकांचा एक मजबूत हात आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : शान मसूदच्या दुखापतीबाबत पीसीबीची मोठी अपडेट, भारत-पाक सामना खेळणार का? घ्या जाणून

या सामन्याचे प्रेक्षपणाचे अधिकार हे डिस्ने+ हॉटस्टार डिजिटलने ताब्यात घेतले असल्याने जाहिरातींचे उत्पन्न अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषकापेक्षा डिजिटलवरील जाहिरातीचे दर २०-२५% ने जास्त आहेत. गेल्या वर्षी याच फिक्स्चरने डिजिटल प्लॅटफॉर्मवर १२ दशलक्ष दर्शक आकर्षित केले होते. यंदा दोन्ही मंडळाच्या शाब्दिक संघर्षांमुळे वाढण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader