टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय संघात आज मोठे बदल होण्याची शक्यता होती. संघ व्यवस्थापनाने देखील याबाबत आधीच संकेत दिले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक जायबंदी झाल्यामुळे शेवटच्या पाच षटकांसाठी ॠषभ पंत यष्टीरक्षण करण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याला आज संघात स्थान मिळणार असे वाटत होते मात्र त्याला संघात स्थान दिले गेले नाही. यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर युजर्सनी संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मजा घेतली आहे. सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर, बीसीसीआयने टीम इंडियाचे प्लेइंग-११ शेअर केले, त्यावर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. यासोबतच ऋषभ पंत हे नावही ट्विटरवर ट्रेंड करू लागले आहे.
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “ऋषभ पंत फक्त ऑस्ट्रेलिया बघायला गेला आहे. या कमेंटसह चाहत्याने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. दुसऱ्या चाहत्याने विचारले, ‘डीके इथे काय करत आहे?’ याशिवाय प्रेक्षकांनी केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-११ मधून वगळल्याबद्दलही बोलले आहेत.
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी झिम्बाब्वे बरोबर असणार आहे. संध्या ग्रुप मध्ये भारत अव्वलस्थानी आहे. जर पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर यात फार मोठे काही बदल घडणार नाहीत. पण यामुळे टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वलस्थानी कायम राहू शकते.