टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने सुपर-१२ फेरीमधील सर्वात मोठा धक्का आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये दिला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन स्पर्धेबाहेर फेकलं आहे. विशेष म्हणजे यामुळे दक्षिण आफ्रिका बाहेर पडल्याने भारत उपांत्य फेरीमध्ये पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवसातील दुसरा सामना म्हणजेच पाकिस्तान आणि बांगलादेश सामना उपांत्य फेरीसारखाच ठरणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत खेळेल असं चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव झाला. नेदरलँड्सने १५८ धावा करुन दिलेलं लक्ष्य आफ्रिकेला झेपलं नाही. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर असला तरी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना जो संघ जिंकेल तो दक्षिण आफ्रिकेची जागा घेईल. विशेष म्हणजे भारताचा एक सामना बाकी असल्याने नेट रन रेटच्या जोरावर भारत पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारत हा पात्र ठरणारा पहिला संघ आहे.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्यानंतर भारत दुसऱ्या गटामध्ये +०.७३ नेट रन रेटसहीत पहिल्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी भारत कायम राहणार आहे. भारताचा एक सामना बाकी असून भारताच्या सहा गुणांची बरोबर पाकिस्तान किंवा बांगलादेशने केली तरी त्यांना नेट रन रेट गाठणं कठीण होणार आहे. पाकिस्तान सध्या चार सामन्यापैकी दोन सामन्यांमधील विजय आणि दोन पराभवांसहीत तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचे दोन्ही पराभव अंतिम चेंडूवर झाल्याने त्याचं नेट रनरेट उत्तम आहे. १.१२ नेट रन रेट असलेला पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जो जिंकणार त्याचे सहा गुण होतील आणि तो पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. सहा गुण असणारा संघ हा दक्षिण आफ्रिकेहून एक स्थान वर जाईल आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

पहिल्या गटामधून न्यूझीलंड आणि इंग्लडचे संघ पात्र ठरले आहेत. दुसऱ्या गटातून पाहिल्या स्थानी असणारा संघ इंग्लंडविरोधात आणि दुसऱ्या स्थानी अशणारा संघ न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल. म्हणजेच भारत आता इंग्लंडविरोधात उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 netherlands win by 13 runs against south africa india qualifies for semifinals scsg