टी २० विश्वचषकातील आज पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेला विश्वचषकात २४ वा सामना हा अतिशय थरारक झाला. या सामन्यात अवघी एक धाव राखून झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावावा लागला. या विजयानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविन याने प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करण्यासाठी आलो आहोत –
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविन म्हणाला, “हा विजय अतिशय खास आहे. विशेषकरून सुपर-१२ राउंडमध्ये पोहचण्यासाठी आम्ही ज्या प्रकारे मेहनत घेतली, त्या दृष्टीने हा विजय विशेष आहे. आम्हाला आमच्यासाठी ही स्पर्धा इथेच संपवायची नव्हती. या स्पर्धेत आम्ही टॉपच्या संघांविरुद्ध दमदार प्रदर्शन करू इच्छित आहोत आणि मला आनंद आहे की आज पाकिस्तानविरोधात अशाप्रकारे कामगिरी करण्यात आम्हाला यश आलं.”
झिम्बाब्वेच्या चाहत्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो –
याशिवाय झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविन म्हणाला, जेव्हा आमचा डाव संपला तेव्हा मला असं वाटलं की आम्ही २०-२५ धावांनी मागे राहिलो. मात्र आमच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आमच्या जलदगती गोलंदाजांनी सामान्यात परत आणलं. यानंतर सिंकर रजा याने तर जबरदस्त कामगिरी केली. त्याने सलग गडी बाद करून सामान्यावर आमची पकड निर्माण केली. सिंकदर रजा बऱ्याचदा आमच्या संघासाठी अशी कामगिरी करत असतो. याचबरोबर क्रेगने म्हटले की, मी झिम्बाब्वेच्या चाहत्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो, मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो.