आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना झाला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने पाकिस्तानसाठी महत्वाच्या असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान पाकिस्तानची गोलंदाजी पाहता फार सोपे असणार नाही.

टी२० विश्वचषक स्पर्धेत आजच्या सामन्यात सुद्धा पावसाने खोडा घातला. याचा पावसाने आफ्रिकेचा घात केला. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. शाहिन शाह आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत आफ्रिकेला जबरदस्त धक्के दिले. टेम्बा बवुमा व एडन मार्कराम यांनी डाव सावरला, पण पावसाने आफ्रिकेचा खेळ बिघडवला. बराच वेळ वाया गेल्यानंतर १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य आफ्रिकेला दिले गेले आणि पाकिस्तानने इथेच संधी साधली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

क्विंटन डी कॉक व रिली रोसोवू हे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. डी कॉकला तर भोपळाही फोडता आला नाही. तर रिलीने ७ धावा केल्या. या दोघांना शाहिन आफ्रिदीने माघारी पाठवल्यानंतर शादाब खानने आफ्रिकेला मोठे धक्के दिले. टेम्बा बवुमाने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३६ धावा केल्या आणि २० धावा करणाऱ्या एडन मार्कराम यांना शादाबने माघारी पाठवल्याने आफ्रिकेची अवस्था ९ षटकांत ४ बाद ६९ अशी झाली. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका १६ धावांनी पिछाडीवर होता. पाऊस थांबल्यानंतर आफ्रिकेसमोर १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि त्यानुसार त्यांना ३० चेंडूंत ७३ धावा करायच्या होत्या.

क्लासेन व त्रिस्तान यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, शाहिनने १५ धावांवर क्लासेनला माघारी पाठवले. मोहम्मद वासीमने १२व्या षटकात आफ्रिकेला धक्का दिला आणि त्यांना १२ चेंडूंत ४३ धावा करायच्या होत्या. नसीम शाहने १३व्या षटकात विकेट घेऊन आफ्रिकेचा पराभव निश्चित केला. ६ चेंडूंत ४१ धावांचे लक्ष्य आफ्रिकेलाही पेलवणारे नव्हते. हॅरीस रौफने १४व्या षटकात २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: ‘नाबाद असूनही तो…’आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नवाजसोबत घडला वेगळाच किस्सा

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या फलंदाजांनी देखील खराब सुरुवात केली होती. मात्र शादाब आणि इफ्तिकार यांनी अर्धशतके करत संघाला १८५ धावांपर्यंत पोहचवले. शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. नॉर्खियाने ही जोडी तोडली, परंतु तोपर्यंत पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक केले होते. नॉर्खियाने ४ षटकांत ४१ धावांत ४ गडी बाद केले. इफ्तिखारही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. वेन पारनेल, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि तबरेझ शम्सी यांना प्रत्येकी गडी बाद करण्यात एक यश मिळाले.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धने विश्वविक्रम मोडणाऱ्या कोहलीला म्हणाला, ‘एक योद्धा…’

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे ग्रुप बी मधील चित्र बदलण्याची शक्यता बळावली आहे. आफ्रिकेने अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून ७ गुणांसह उपांत्य फेरीत जाईल. भारत अखेरची लढत ( झिम्बाब्वे) जिंकून ८ गुणांसह टेबल टॉपर होईल. अशा परिस्थितीत ग्रुप १ मधून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी होईल.

Story img Loader