या विश्वचषकात सुर्यकुमार यादव ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. सुर्यकुमारने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे. एकापाठोपाठ एक सामन्यात तो सातत्याने धावा करत आहे. षटकार आणि चौकार मारले. हा विश्वचषक कोणत्याही दोन गोष्टींसाठी लक्षात ठेवला तर तो सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यासाठी लक्षात राहील. दोन्ही खेळाडू कदाचित त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत.
सुर्यकुमार ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजाला अशक्य असल्याचे दिसते. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम, वकार युनूस यांनाही सुर्यकुमारच्या फलंदाजीची खात्री पटली आहे. त्याच्या याच खेळीने तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सूर्या सध्या त्याच्या ड्रीम फॉर्म मधून जात आहे. तो जी पण खेळी करत आहे ती अविश्वसनीय म्हणून ओळखली जात आहे. याच त्याच्या खेळीवर वकार युनुस आणि वसीम अक्रम यांनी कौतुक केले आहे.
सुर्यकुमार यादव हा परग्रहावरून आलेला खेळाडू आहे
वसीम अक्रम म्हणाला की, “मला वाटते की सुर्यकुमार यादव वेगळ्या ग्रहावरून आला आहे. तो इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या वर्षी टी२० मध्ये १००० धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एका वर्षात टी२० मध्ये १००० धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याने २० चेंडूत अर्धशतक ठोकले आहे, जे विश्वचषकातील चौथे जलद अर्धशतक आहे. त्याने २२ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे, जे विश्वचषकातील चौथे जलद अर्धशतक आहे. त्याला पाहणे आश्चर्यकारक आहे, त्याला फलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायक आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुर्यकुमारने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध या धावा केल्या आहेत. त्याने खेळलेले काही शॉट्स पाहून ते खरे आहेत यावर विश्वास बसत नाही.
त्याच कार्यक्रमात वकार युनुस म्हणाला की, “मला वाटते की तो दुसऱ्या जगातून आला आहे. त्याची फलंदाजी पाहण्यात मजा येते. झिम्बाब्वेविरुद्ध तो असा खेळला नाही, तर आघाडीच्या गोलंदाजांविरुद्धही त्याची फलंदाजी तशीच राहिली आहे.” अक्रम जेव्हा या गोष्टींबद्दल बोलत होता, तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही वकारच्या सुरात सूर मिसळत म्हणाला की, “शेवटी, गोलंदाज गोलंदाजी करताना चेंडू टाकणार तरी कुठे?”
पुढे वकार बोलताना म्हणाला की, “तुम्ही सूर्याविरुद्ध विशेषत: टी२० मध्ये प्लॅनिंग करू शकत नाही. , तुम्ही एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये नियोजन करून आलात आणि त्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता पण टी२० मध्ये गोलंदाजांना बाद करणे कठीण होते.” वकार सुर्याविषयी बोलताना म्हणाला की, “मेलबर्नमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध शॉर्ट बॉल टाकण्याची रणनीती अवलंबली होती, जी खूप प्रभावी ठरली. सुर्याला गप्प बसवण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे मला वाटते. टी२० विश्वचषकात पाकिस्तान, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत.