सिडनी : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघांदरम्यान गुरुवारी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील सामन्यात प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांमधील वर्चस्वाची चढाओढ बघायला मिळणार आहे. भारताने बुधवारी बांगलादेशवर मिळविलेल्या विजयामुळे त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. आता गटातील दुसऱ्या संघासाठी दक्षिण आफ्रिका प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांना फक्त एक विजय पुरेसा आहे, तर पाकिस्तानला विजय मिळवून आव्हानाच्या शर्यतीत राहता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा सामना दुबळय़ा नेदरलँड्स संघाशी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सध्या तरी बाद फेरीचा मार्ग खुणावतोय यात शंका नाही. अर्थात, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानसमोर पूर्ण ताकदीने उभे राहावे लागेल. याची सर्व जबाबदारी अर्थातच लुन्गी एन्गिडी, आनरिक नॉर्किए, कगिसो रबाडा, वेन पार्नेल या वेगवान गोलंदाजांवर राहणार आहे. क्विंटन डीकॉक, रिली रुसो, एडीन मार्करम, डेव्हिड मिलर हे त्यांचे फलंदाज लय राखून आहेत. 

दुसरीकडे, पाकिस्तानसाठी गोलंदाजीचा प्रश्न नाही. शाहिन शाह अफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह यांच्याबरोबर शादाब खान आणि महंमद नवाझची फिरकी दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी सज्ज असेल. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीच्या जोडीवर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आशा अवलंबून राहणार आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 pakistan vs south africa match prediction zws