टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा सामना पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान शेवटच्या षटकात चांगलाच थरार पाहायला मिळाला.
पाकिस्तानला शेवटच्या षटकात ११ धावा बनवायच्या होत्या आणि मोहम्मद नवाज व मोहम्मद वसीम ज्युनिअर हे फलंदाजी करत होते. नवाजने ब्रॉड इवान्सच्या पहिल्या चेंडूवर ३ रन केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर वसीमने चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक रन घेत स्ट्राइक पुन्हा नवाजकडे दिली. आता पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या तीन धावांची आवश्यकता होती. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नवाजला एकही धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र मिडऑफ वर एर्विनने त्याचा झेल घेतला. मोहम्मद नवाजच्या रुपात पाकिस्तानचा सातवा गडी बाद झाला. त्याने १८ चेंडूंत २२ धावा काढल्या. आता शेवटा चेंडू शिल्लक होता आणि पाकिस्तानला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती.
हेही वाचा – T20 World Cup: भारतापाठोपाठ झिम्बाब्वेचा पाकिस्तानला झटका
शाहीन आफ्रिदीकडे स्ट्राइक होती, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालेले असल्याने तो चेंडू बॅटला लागताच धाव घेण्यासाठी पळत सुटला पहिली धाव काढल्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी जेव्हा तो पळाला, दरम्यान दुसरीकेड सतर्क असलेल्या एर्विनने थेट चकबवाकडे चेंडू फेकला यावेळी सुरुवातीला तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातून निसटला मात्र त्याने दुसऱ्याच क्षणी तो चेंडू पकडला क्षणार्धात स्टम्प्सला लावला. अशाप्रकारे पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं.शाहीनने एका चेंडूवर एक धाव काढली व तो बाद झाला.