टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
शोएब अख्तरने बांगलादेशच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. तो म्हणतो की, “एकवेळेस असे वाटत होते की, बांगलादेश हा सामना भारताच्या हातून काढून घेणार. पण पावसाने मध्ये अडथळा आणला आणि तो टीम इंडियासाठी फायद्याचा ठरला. जो काही अर्धातास पावसाने गोंधळ घातला त्यामुळे जो मोमेंटम होता तो ब्रेक झाला आणि भारत त्या सामन्यात पुन्हा आला. पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात परत आणले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत सामन्यातील चक्र फिरवले. दोलायमान असणाऱ्या सामन्यात शेवटी भारताने पाच धावांनी जिंकला. टीम इंडियाचे अभिनंदन!”
पुढे विराट कोहली विषयी बोलताना तो म्हणाला की, “ हा टी२० विश्वचषक खास विराट कोहलीसाठी तयार केला आहे आणि त्याला जसे हवे आहे तसे अल्लाह त्याला देत आहे. त्यामुळे २०२२ हे वर्ष खास विराटसाठी तयार केले असून त्याने त्याच्या खेळीचा आनंद घ्यावा. त्याने खूप मेहनत आणि कष्ट घेतले असून भरपूर टीका ही सहन केली आहे. त्यामुळे तो कौतुकास पात्र आहे.”
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी झिम्बाब्वे बरोबर असणार आहे. संध्या ग्रुप मध्ये भारत अव्वलस्थानी आहे. जर पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर यात फार मोठे काही बदल घडणार नाहीत. पण यामुळे टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वलस्थानी कायम राहू शकते.