टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील सामना आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. हा सामना सिडनीत येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना, ५ गडी गमावून २०५ धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेश संघाला २०६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या सामन्यात रिले रॉसोने या टी२० विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. त्याच्या याच शानदार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला तब्बल १०४ धावांनी दारूण पराभव केला. रिले रॉसोने १०९ धावांची खेळी केली त्याला या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण आफ्रिकेने हा सामना १०४ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १६.३ षटकांत १०१ धावांत गुंडाळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक होते रिले रोसो, एनरिच नोर्टजे आणि तबरीझ शम्सी. रोसोने शानदार शतक झळकावले. त्याचवेळी नॉर्टजेने चार आणि शम्सीने तीन गडी बाद केले.

रिले रोसोने सर्वाधिक १०९ धावा केल्या. रिले रोसोने या टी२० विश्वचषकात पहिले शतक झळकावले. या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तो आपल्या संघाचा पहिला फलंदाज आहे. त्याचे टी२० कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. रोसोने सलग दुसऱ्या टी२० डावात शतक झळकावले. यापूर्वी ४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध इंदूरमध्ये त्याने १०० धावांची नाबाद इनिंग खेळली होती. झिम्बाब्वेविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. रोसोने ५६ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले.

डी कॉक आणि रोसो यांनी १६३ धावांची भागीदारी केली

क्विंटन डी कॉक ३८ चेंडूत ६३ धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारले. डी कॉकने सौम्या सरकारला अफिफ हुसेनकरवी झेलबाद केले. डी कॉकने रोसोसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८५ चेंडूत १६३ धावांची भागीदारी केली.

आफ्रिकन गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ११ पैकी सात फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. लिटन दासने सर्वाधिक ३४ धावा केल्या. सौम्या सरकारने १५, मेहदी हसनने ११ आणि तस्किन अहमदने १० धावा केल्या. नजमुल हुसेनला केवळ नऊ धावा करता आल्या. कर्णधार शकीब अल हसन आणि अफिफ हुसेन प्रत्येकी एक धाव काढून तंबूत परतले. मोसाद्देक हुसेन आणि हसन महमूद यांना खातेही उघडता आले नाही. मुस्तफिझूर रहमानने नाबाद नऊ आणि नूरुल हसनने दोन धावा केल्या. आफ्रिकन संघासाठी अॅनरिक नॉर्टजेने ३.३ षटकांत १० धावा देत ४ बळी घेतले. शम्सीने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेतले. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.