भारत आणि नेदरलँड्स संघात टी-२० विश्वचषक २०२२ चा सामना खेळला गेला. सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर ५६ धावांनी मात केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर, नेदरलँड्स संघाला १८० धावांचे लक्ष्य दिले होते. रोहित शर्माने अर्धशतक झळकावत अनेक खास विक्रम आपल्या नावी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१८० धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेलेल्या संघाला ९ बाद १२३ धावाच करता आल्या. तत्पुर्वी रोहितने ३९ चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रोहित स्वस्तात बाद झाला होता.

रोहितचा टी-२० विश्वचषकातील हा नव्यांदा पन्नासपेक्षा अधिक धावा आहेत. रोहित ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ९ वेळा हा पराक्रम करणाऱ्या ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. या यादीत विराट कोहलीने १२ वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत, त्यामुळे तो पहिल्या स्थानावर आहे.

याशिवाय विराट कोहलीनंतर रोहित हा दुसरा खेळाडू आहे ज्याने भारतीय कर्णधार म्हणून या स्पर्धेत अर्धशतक झळकावले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या खेळीत त्याने ३४ षटकार लगावले आहेत. रोहितने या फॉरमॅटमध्ये ३३ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे.

रोहितने तिलकरत्ने दिलशानला टाकले मागे –

तिलकरत्ने दिलशानला (८९७ धावा) मागे टाकत रोहित टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या खेळीसह रोहितच्या एकूण ९०४ धावा झाल्या आहेत. त्याचबरोबर सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा रोहित तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आता १२२७४ धावा झाल्या आहेत. रोहितने भारतासाठी सलामीवीर म्हणून १२२५८ धावा करणाऱ्या सुनील गावस्करला मागे सोडले आहे.

हेही वाचा – IND vs NED T20 World Cup 2022 : अर्धशतक झळकावताच सूर्यकुमार यादवने केला विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू