टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२सामन्यात पाकिस्तानचा संघ बांगलादेशशी भिडणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशी संघाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. या गटातून भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे पाच तर पाकिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी चार गुण आहेत. पाकिस्तानने शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाचा पराभव केल्यास त्याचे ६गुण होतील. मात्र, उपांत्य फेरीच्या निकालासाठी पाकिस्तानला भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, पाकिस्तानसाठी करो या मरो असा सामना असून उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ही शेवटची संधी आहे. भारतीय संघाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या बांगलादेशने टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढवली. लिटन दास व नजिमूल शांतो यांनी दमदार खेळ केला, परंतु शादाब खानच्या एका षटकात सामना फिरला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याची विकेट तिसऱ्या पंचांनी ढापली आणि नाराज झालेला शाकिब बराच काळ मैदानावरच उभा राहून निषेध नोंदवताना दिसला. त्याने मैदानावरील पंचांशी हुज्जतही घातली.

नेदरलँड्सकडून मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर उतरले आहेत.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास व मजमुल होसैन शांतो यांनी दमदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीला तिसऱ्या षटकात लिटन दासने मारलेला षटकात पाहण्यासारखा होता. पण, त्याच षटकात पॉईंटच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्नात लिटन दास (१०) शान मसूदच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

मोहम्मद वसीमच्या पुढच्या षटकात शादाब खानने बांगलादेशचा दुसरा सलामीवीर शांतोचा सोपा झेल टाकला आणि शांतोने त्यानंतर खणखणीत चौकार – षटकार खेचला. शांतो पाकिस्ताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता आणि बाबर आजम अँड ब्रिगेडचे मनोबल ढासळताना दिसत होते. शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली. ११व्या षटकात शादाबने ही भागीदारी संपुष्टात आणली. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सौम्या (२०) झेलबाद झाला. पुढच्याच षटकात शादाबने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला पायचीत केले. डीआरएस घेतल्यानंतर शाकिब बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु शाकिब मैदाना सोडण्यास तयार नव्हता.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 shakib al hasans wicket under controversy as soon as he got out he argued with the umpire see the video avw