टी२० विश्वचषकात सुपर १२ चा टप्पा सुरू झाला असून दुसऱ्या सामन्यात, एकदिवसीय विश्वचषक विजेता संघ इंग्लंडचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध सुरु होता. पर्थच्या मैदानावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ११२ धावांत गुंडाळला. सॅम करणच्या भेदक गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचा संघ निष्प्रभ ठरला. इंग्लंड संघाने अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. सॅम करन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणातील कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केले. अप्रतिम झेल आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला ११२ धावांवर रोखण्यात यश आले. गोलंदाजांची प्रशंसा तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाला देखील तितकेच क्रेडीट दिले पाहिजे. यामध्ये काही उत्कृष्ट झेल होते, जे विशेषत: आदिल रशीद, जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी टिपलेले तीन झेल.

आदिल रशीदने नजिबुल्लाह चा, जोस बटलर ने कर्णधार मोहम्मद नबीचा तर ख्रिस वोक्स ने मुजीब चा अप्रतिम झेल पकडत सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले.  त्यानंतर मात्र एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. अष्टपैलू सॅम करनने केवळ १० धावा देत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत धाडला. मार्क वूड व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन तर ख्रिस वोक्सने एक गडी बाद केला.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या राशिद, बटलर, वोक्सने घेतले अफलातून झेल, पाहा video

अफगाणिस्तानने कमी धावांमध्ये देखील झुंजार खेळ दाखवत अतिशय चिवट अशी गोलंदाजी केली. जोस बटलर, ऍलेक्स हेल्स व डेव्हिड मलान या तीनही फलंदाजांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले होते. सरळ हाताने त्यांना फटके मारू दिले नाहीत. बेन स्टोक्स व हॅरी ब्रुक हे देखील अपयशी ठरल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोनने वेळीच मोठे फटके खेळत संघाला पराभवापासून वाचवले. त्याने नाबाद २९ धावा केल्या.