भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा धावा निघायला सुरुवात झाली आहे. टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावल्यानंतर कोहली आफ्रिकेविरुद्ध स्वस्तात बाद झाला, पण बांगलादेशविरुद्ध नाबाद ६४ धावा करून कोहली पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात त्याच्या दमदार खेळीच्या बळावर विराट कोहली टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने महेला जयवर्धनेचा टी२० मधील विक्रम मोडीत काढला. यानंतर श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूने विराट कोहलीचे विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याने विराट कोहलीचे वर्णन योद्धा असे केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १६वी धाव पूर्ण केल्यामुळे त्याने २०१४ पर्यंत केलेल्या टी२० विश्वचषकात महेला जयवर्धनेच्या सर्वाधिक धावांचा (१०१६) विक्रम मागे टाकला. विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेला जयवर्धने भारताच्या स्टार फलंदाजाचे नवीन विक्रम रचल्याबद्दल अभिनंदन करत आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने म्हणाला, “विक्रम मोडण्यासाठी बनवले जातात. कोणीतरी माझा विक्रम मोडणार होता आणि तो तू ‘विराट’ विक्रम मोडला आहेस. अभिनंदन मित्रा. तू नेहमीच योद्धा होतास आणि पुढेही राहशील. फॉर्म तात्पुरता आहे परंतु फलंदाजीतील क्लास हा मात्र कायम असतो. तू माझा खूप जिवलग मित्र आहेस.” अशा शब्दात त्याने माझे कौतुक केले.

विराट कोहलीच्या नावावर टी२० विश्वचषकामध्ये १०६५ पेक्षा जास्त धावा आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर ९२१ धावा आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हे दोन्ही भारतीय फलंदाज अनुक्रमे पहिल्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेने ३१ सामन्यांत ३९.०७ च्या सरासरीने १०१६ धावा केल्या आहेत. १००च्या वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्येसह आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. टी२० विश्वचषकात या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: ‘ॲडलेड मध्ये इंडिया इंडिया…’सुर्यकुमार यादवने भारतीय चाहत्यांना प्रोत्साहित केल्याचा video व्हायरल 

कोहलीसाठी अॅडलेड ओव्हल मैदान नेहमीच भाग्यवान ठरले आहे. या मैदानावर त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आणि दोन वर्षांनंतर कर्णधार म्हणून कसोटी पदार्पण करताना दोन्ही डावात शतके झळकावली. पाकिस्तानविरुद्ध २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात देखील त्याने शतक केले होते.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 sri lanka legend mahela jayawardene calls world record breaker kohli a warrior avw